सैतवडे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST2021-04-16T04:30:54+5:302021-04-16T04:30:54+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची नूतन कार्यकारिणी जाहीर आली असून, अध्यक्षपदी रहीम हसन माद्रे, उपाध्यक्षपदी तौफिक इरशाद ...

Saitwade Muslim Education Society executive announced | सैतवडे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची कार्यकारिणी जाहीर

सैतवडे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची कार्यकारिणी जाहीर

रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची नूतन कार्यकारिणी जाहीर आली असून, अध्यक्षपदी रहीम हसन माद्रे, उपाध्यक्षपदी तौफिक इरशाद चिकटे यांची निवड करण्यात आली.

मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडे ही संस्था रत्नागिरी तालुक्यातील नावाजलेली संस्था असून, संस्थेच्या दी मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. हायस्कूलमध्ये झालेल्या बैठकीत मुस्लिम एजुकेशन सोसायटी, सैतवडेचीे नवीन समिती जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी रहीम माद्रे, उपाध्यक्ष तौफिक चिकटे, गनी खतीब, मुजम्मिल दळवी, जनरल सेक्रेटरीपदी रूमान पारेख, सहसेक्रेटरी इलियास माद्रे, खजिनदार वहाब खलफे, सदस्यपदी अकरम कापड, शफी चिकटे, शादाब लांबे, अजीज वागळे, नकाश पिलपिले, करामत खलफे, गफ्फार बोंद्रे, युसूफमियाँ खलफे, निसार खतीब, सज्जाद सय्यद, सलीम चिकटे, रफीक मुल्ला यांची निवड करण्यात आली आहे.

........................

सैतवडे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची नूतन कार्यकारिणी जाहीर आली.

Web Title: Saitwade Muslim Education Society executive announced