सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:25+5:302021-09-14T04:37:25+5:30
हातखंबा : येथील गुरुवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर आणि श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनिअर काॅलेजमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात ...

सहविचार सभा
हातखंबा : येथील गुरुवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर आणि श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनिअर काॅलेजमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात शालेय व्यवस्थापन समिती, हितचिंतक व शिक्षणप्रेमी यांची संयुक्तिक सभा हातखंबा सरपंच जितेंद्र तारवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती महेश म्हाप, विस्तार अधिकारी डाॅ. अस्मिता मजगावकर, उपसरपंच सुनील डांगे, पोलीस पाटील शर्वरी सनगरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
वीजखांब बदलले
राजापूर : तालुक्यातील शिवणेखुर्द परिसरातील ११ वीजखांब बदलण्यात आले आहेत. शिवणेखुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश मराठे यांच्या प्रयत्नाने हे वीजखांब बदलण्यात आले आहेत. शिवणेखुर्द येथील अनेक वीजखांब अनेक वर्षे बदलण्यात आले नव्हते. वीजखांब धोकादायक बनले होते. हे वीजखांब बदलण्यासाठी सिद्धेश मराठे यांनी प्रयत्न केले.
बसस्थानकातील खड्डा भरला
चिपळूण : शहरातील शिवाजीनगर बसस्थानकातील भलामोठा खड्डा अखेर सभापती रिया कांबळे यांच्या प्रयत्नातून भरण्यात आला. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या गाड्या शिवाजीनगर बसस्थानकातून रवाना होतात. या बसस्थानकात गेली कित्येक वर्षे मोठा खड्डा पडलेला होता तो अखेर भरण्यात आला.