शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गणपतीपुळेत भाद्रपदी गणेशोत्सव सुरू; श्रीच्या मंदिरात आज सहस्त्र मोदक समर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:35 IST

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे स्वयंभू श्री मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सव सुरू असून, सोमवार २५ ऑगस्ट रोजी ...

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे स्वयंभू श्री मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सव सुरू असून, सोमवार २५ ऑगस्ट रोजी सहस्त्र मोदक समर्पण करण्यात आले.विश्वस्त विनायक तुकाराम राऊत यांनी सपत्नीक मनोभावे पूजा आणि सहस्रनाम समर्पण करत सहस्र मोदक श्रींना समर्पण केले.यावेळी संस्थानचे मुख्य पुजारी प्रभाकर घनवटकर, नीलेश घनवटकर, अमित घनवटकर, चैतन्य घनवटकर तसेच विश्वस्त विद्याधर शेंडे आणि अनेक भक्तगण उपस्थित होते.

महापूजेद्वारे प्रारंभ स्वयंभू श्री गणरायाच्या मुख्य मंदिरामध्ये काल, रविवारपासून भाद्रपद गणेशोत्सवाला महापूजेद्वारे प्रारंभ करण्यात आला. संस्थान श्रीदेव गणपतीपुळेतर्फे पंच नीलेश कोल्हटकर यांनी सपत्नीक ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारांच्या जयघोषात महापूजा केली. ‘श्रीं’चे मंदिर पानाफुलांनी तसेच विद्युत रोषणाईने सजवण्यात आले हाेते. रविवार, २४ ते २८ ऑगस्ट २०२५ हे  पाच दिवस उत्सव चालणार आहे. यावेळी मंदिराचे मुख्य पुजारी  प्रभाकर  घनवटकर, अमित घनवटकर,  नीलेश  घनवटकर तसेच इतर सर्व ब्रह्मवृंद आणि अध्यक्ष  श्रीराम केळकर, पंच विनायक राऊत, पंच सचिव विद्याधर शेंडे, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे कर्मचारी, ग्रामस्थ व पर्यटक उपस्थित होते. या भाद्रपदी गणेशोत्सवासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंच कमिटी मंदिराचे मुख्य पुजारी व ब्रह्मवृंद संस्थान श्रीदेव गणपतीपुळेचे कर्मचारी मेहनत घेत आहेत.