फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST2021-09-02T05:09:05+5:302021-09-02T05:09:05+5:30

दापोली : तालुक्यातील देवकी येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुटका करण्यात आली असून, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार ...

Safe release of a leopard trapped in a trap | फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

दापोली : तालुक्यातील देवकी येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुटका करण्यात आली असून, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

देवकी येथे बिबट्या फासकीत अडकल्याची खबर वन विभागाला देण्यात आली होती. दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तत्काळ तेथे दाखल झाले. त्यांनी केलेल्या अथक् प्रयत्नातून बिबट्याची फासकीतून सुटका केली. तेथून त्याला पिंजऱ्यातून दापोलीत आणण्यात आले आणि तेथून त्याची नैसर्गिक अधिवासात रवानगी करण्यात आली.

विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, वनपाल दापोली सावंत, पालखेडचे सुरेश उपरे, अनिल दळवी, वनरक्षक सुरेश जगताप, गणपती जळणे, परमेश्वर डोईफोडे, अशोक ढाकणे, संजय गोसावी, अनंत मंत्रे ढेकळे व सर्पमित्र किरण करमरकर, सुहास खानविलकर यांनी बिबट्याला फासकीतून सोडविले.

Web Title: Safe release of a leopard trapped in a trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.