शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. कर्मचाऱ्यांचा कुटुंबासमवेत आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:18 IST

एस. टी. कर्मचार्‍यांना मागील तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित राहावं लागलं आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना या कर्मचार्‍यांना मात्र मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आणि वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी एस. टी. कर्मचार्‍यांनी सोमवारी आपापल्या घरासमोर कुटुंबासह आक्रोश आंदोलन केले.

ठळक मुद्देएस. टी. कर्मचाऱ्यांचा कुटुंबासमवेत आक्रोशतीन महिन्यांपासून पगारापासून वंचित

रत्नागिरी : एस. टी. कर्मचार्‍यांना मागील तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित राहावं लागलं आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना या कर्मचार्‍यांना मात्र मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आणि वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी एस. टी. कर्मचार्‍यांनी आपापल्या घरासमोर कुटुंबासह आक्रोश आंदोलन केले.पगाराची तारीख उलटूनही एस. टी. कर्मचार्‍यांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा झालेली नाही. सातत्याने तीन महिने हाच प्रकार सुरु असल्यामुळं सणावाराच्या दिवसांमध्ये कर्मचार्‍यांपुढे मोठी अडचण उभी राहिली आहे. कोरोना महामारीमध्ये एस. टी. कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रात्रं-दिवस आपले कर्तव्य बजावत आहेत.

बेस्टमधील कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे १५ हजार ५०० व १० हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. परंतु, एस. टी. कर्मचारी राज्यभर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत असूनही त्यांना तीन महिन्यांचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असतानाही प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. संघटनेने वारंवार पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करूनही त्याची दखल एस. टी. प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढला असून, प्रलंबित वेतन मिळण्यासाठी सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी कर्मचार्‍यांनी आपल्या घरी कुटुंबासह आक्रोश व्यक्‍त केला.दिवाळीपूर्वी एस. टी. कर्मचार्‍यांना 3 महिन्यांचे थकीत वेतन, थकीत महागाई भत्ता, सण उचल न मिळाल्यास एस. टी. प्रशासनाने वेतन कायदा व कामगार करारातील तरतुदीचा भंग केल्याबद्दल संघटनेमार्फत प्रशासनाविरोधात मुंबई येथील औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे. 

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी