एस. टी. विभाग तोट्यात

By Admin | Updated: February 23, 2016 00:24 IST2016-02-23T00:24:39+5:302016-02-23T00:24:39+5:30

परिवहन महामंडळ : वर्षभरात १ कोटी ८७ लाखांचा फटका

S. T. Department Loss | एस. टी. विभाग तोट्यात

एस. टी. विभाग तोट्यात

 रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला एप्रिल २०१५ ते जानेवारी २०१६ अखेरीस नऊ महिन्यांमध्ये तब्बल १ अब्ज ९६ कोटी १ लाख ३ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षी नऊ महिन्यांमध्ये १ अब्ज ९७ कोटी ८८ लाख १२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रत्नागिरी विभागाला १ कोटी ८७ लाख ९ हजार रुपयांचा तोटा झाला आहे.
खासगी वाहतुकीकडे प्रवासी वळत असल्यामुळे महामंडळ ‘प्रवासी वाढवा’ अभियान राबवित आहे. मात्र, कोलमडलेले वेळापत्रक, शिवाय अचानक होणारे बंद, प्रवाशांशी चालक-वाहकांचे उध्दट वर्तन, आदी प्रकारांमुळे एस. टी.चा प्रवासीवर्ग दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. महागाईचा परिणाम तिकीट दरावरही झाला आहे. मात्र, प्रवासी संख्या घटत असल्यामुळे महामंडळाला आर्थिक तोटा सोसावा लागत आहे. वेळेत न सुटणाऱ्या गाड्यांबरोबरच कोणाच्या तरी दबावाखाली व्हाया करण्यात येत असल्याने गाडीचे अंतर वाढत आहे. ज्या ठिकाणी भारमान नाही, त्याठिकाणीही बसेस व्हाया केल्या जातात. त्यामुळे खर्च जास्त आणि त्यामानाने उत्पन्न कमी अशी महामंडळाची अवस्था आहे.
जिल्ह््यातील नऊ आगारांपैकी केवळ दापोली व मंडणगड आगारांचे उत्पन्न काही प्रमाणात वाढले असले तरी अन्य सात आगारांमधील उत्पन्न घटले आहे. दिवसेंदिवस राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे घटते उत्पन्न ही महामंडळासाठी चिंतेची बाब बनली आहे. (प्रतिनिधी)
दोन वर्षातील एस. टी.चे उत्पन्न (कोटीत)
आगार २०१४ २०१५ आगार २०१४ २०१५
दापोली २४.१० २४.६६ रत्नागिरी ४०.२८ ३९.६२
खेड २४.०७ २३.५० लांजा १२.५२ १२.२४
चिपळूण ३२.८१ ३२.३० राजापूर १३.८८ १३.७०
गुहागर २०.६३ २०.४१ मंडणगड ०९.८० ०९.८९
देवरूख १९.७५ १९.६६ एकूण १९७.८८ १९६.०१

Web Title: S. T. Department Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.