शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. बंदचा परिणाम : रत्नागिरी विभागाला ५० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:37 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जाहीर केलेला वेतनकरार अमान्य असल्याच्या निषेधार्थ अघोषित पुकारण्यात आलेल्या संपामुळे रत्नागिरी विभागातून १६१५पैकी केवळ ४४४ फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. जेमतेम २५ टक्केच फेऱ्या सुटल्या. त्यामुळे दिवसभरात रत्नागिरी विभागाचे ५० लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देएस. टी. बंदचा परिणाम : रत्नागिरी विभागाला ५० लाखांचा फटकाग्रामीण भागातील प्रवाशांचे गाड्याविना हाल

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जाहीर केलेला वेतनकरार अमान्य असल्याच्या निषेधार्थ अघोषित पुकारण्यात आलेल्या संपामुळे रत्नागिरी विभागातून १६१५पैकी केवळ ४४४ फेऱ्या दिवसभरात सोडण्यात आल्या. जेमतेम २५ टक्केच फेऱ्या सुटल्या. त्यामुळे दिवसभरात रत्नागिरी विभागाचे ५० लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कामगारासांठी २०१६ - २०२०साठी ४.८४९ कोटी रूपयांची भरघोस वेतनवाढ करून वेतन करार जाहीर केला आहे. वेतन कराराव्दारे एस. टी.च्या एक लाख पाच हजार ६७९ कर्मचाऱ्यांना ३२ ते ४८ टक्क्यांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.नियमित वेतश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्यामुळे किमान ४,६१९ ते कमाल १२,०७१ रूपये इतकी वाढ होणार आहे. पूर्वी पाच वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना ४ वेतनवाढ व तीन वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना २ वेतनवाढ, या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता किमान ४,६१९ ते कमाल ९,१०५ रूपये वाढ होणार आहे.

१ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१८ या कर्मचाऱ्यांच्या २६ महिन्यांच्या थकबाकीची रक्कम १,१९७ कोटी रूपये ४८ समान हप्त्यामध्ये अदा करण्यात येणार आहे. परंतु हा करार अमान्य असल्याच्या निषेधार्थ महामंडळाचे सर्व कर्मचारी अघोषित संप पुकारून उत्स्फूर्तरित्या संपात सहभागी झाले आहेत.

संपाची कोणतीही पूर्वसूचना किंवा निवेदन न देता कर्मचारी संपावर गेल्याने प्रशासनाची गैरसोय झाली. महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेचे कामगार संपात सहभागी झाले नव्हत. त्यामुळे उपस्थित चालक, वाहक व कर्मचाऱ्यांव्दारे प्रशासनाने जमेल तेवढे काम करून प्रशासनाला सहकार्य केले.रत्नागिरी विभागातून दिवसभरात १६१५ फेऱ्या सोडणे अपेक्षित होते. पैकी ४४४ फेऱ्या सोडण्यात आल्या. भरपावसात महामंडळाच्या कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

संपाची पूर्वसूचना नसल्यामुळे बसस्थानकात प्रवासी अधिक वेळ ताटकळत उपस्थित होते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने खासगी वाहनांना परवानगी दिली आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या बाहेरून खासगी गाड्या सोडण्यात येत होत्या. खासगी वाहतूकदारांचा व्यवसाय यामुळे तेजीत झाला.दापोली आगारातून १५७ फेऱ्या दिवसभरात सुटणे आवश्यक होते. पैकी आठच फेऱ्या सोडण्यात आल्या. खेड आगारातून २११ व गुहागर आगारातून ११७ फेऱ्या सुटणे गरजेचे असताना दोन्ही आगारातून एकही फेरी सोडण्यात आलेली नाही. दोन्ही आगारात कडकडीत संप पुकारण्यात आला.चिपळूण आगारात ३०६ फेऱ्या सुटणे आवश्यक असताना अवघी एक फेरी सोडण्यात आली आहे. देवरूख आगारातून १४२ फेऱ्या सोडणे गरजेचे होते पैकी १४ फेऱ्या सोडण्यात आल्या. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकातून १८१पैकी ११० फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.

शहरी मार्गावर २१६पैकी १७९ फेऱ्या सोडल्या. लांजा आगारातून १२६ पैकी ११६ फेऱ्या सुटल्या. राजापूर आगारातून ८७ फेऱ्या सुटणे अपेक्षित असताना ११ फेऱ्या सोडण्यात आल्या. मंडणगड आगारातून ७२ पैकी ५ फेऱ्या सोडण्यात आल्या. 

महामंडळाचे कर्मचारी अघोषितरित्या संपात उतरले आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सरकारने खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे. सेनाप्रणित संघटनेचे चालक - वाहक कामावर असल्याने जिल्हाभरात २५ टक्के फेऱ्या चालविण्यात आल्या. महामंडळाने नवीन भरतीमध्ये चालक कमवाहक नियुक्त केले आहेत. हेदेखील संपात सहभागी झाले. - अनिल मेहतर,विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग

या संपामुळे सरकारने खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे. बसस्थानकांच्या बाहेरून या गाड्या सोडण्यात येत होत्या. या गाड्यांमुळे प्रवाशांना फायदा झाला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारीदेखील बसस्थानकात उपस्थित राहून ग्रामीण भागातील महिला प्रवाशांना मार्गदर्शन करत होते.

पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. मात्र, खासगी गाड्या आपल्या गावातील मार्गावर जात असल्याची माहिती मिळताच हातातील पिशव्या सांभाळत वाहन पकडण्यासाठी मंडळी धावत होती.संपाला खेड व गुहागर आगारातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याने एकही गाडी सुटू शकली नाही. चिपळुणातून केवळ एकच गाडी सुटली. मात्र, रत्नागिरी शहरी मार्गावरील फेऱ्यावर संपाचा कोणताही परिणाम जाणवला नाही. २१६पैकी १७९ फेऱ्या सुटल्या. लांजा आगारातून १२६ पैकी ११६ फेऱ्या सुटल्या. अन्य आगारातील कर्मचारी संपात असल्यामुळे मोजक्याच कर्मचाऱ्यामुळे काही फेऱ्या सुटल्या. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी