मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भाग उपेक्षितच...

By Admin | Updated: April 28, 2015 23:46 IST2015-04-28T22:14:00+5:302015-04-28T23:46:31+5:30

लोकप्रतिनिधी, प्रशासनाची डोळेझाक : कळकवणेत एस. टी. नाही, रस्ते दुर्लक्षित

The rural areas of Mandangad taluka are neglected ... | मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भाग उपेक्षितच...

मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भाग उपेक्षितच...

देव्हारे : मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांची परिस्थिती बिकट झाली असून विकासाच्या सर्व प्रश्नांवर हा भाग मागे असल्याचे पाहायला मिळत आहे. रस्ते, वीज, पाणी या प्रश्नांवर तालुक्यात कोणीही लक्ष देत नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. कळकवणे, रानवली, केरीळ, बलदेवाडी गावांचा समावेश आहे़ आपल्या ग्रामिण भागाचा विकास होईल, या उद्देशाने लोकं त्यांना निवडून देतात. मात्र, ग्रामीण भागांच्या या गरजांकडे वर्षानुवर्ष कानाडोळा करण्यात येतो़ याला जबाबदार कोण? या गावाना तालुक्यातील जोडणारे रस्ते आजही लाल मातीचे आहेत.
एस. टी.चे दर्शनही झाले नसलेल्या कळकवणे गावात १०० पेक्षा अधिक घरे आहेत़ या गावाची लोकसंख्या ३५० आहे़ मात्र, गावाला एस. टी. येत नसल्याने या गावातील शालेय विद्यार्थ्यांना लाल मातीच्या रत्यावरून पायीच चालत शाळा, हायस्कूल व कॉलेजला यावे लागते.़ हीच अवस्था रानवली, केरीळ व बलदेवाडी या गावांची आहे. या गावांमध्ये दोनशेपेक्षा जास्त घरे आहेत़ व या तिन्ही गावांची लोकसंख्या सुमारे सातशेपेक्षा जास्त आहे. मात्र, एस. टी.चे दर्शन या गावांनाही झालेले नाही. या गावांना तालुक्याशी जोडणारे रस्ते आजही डांबरीकरण्याच्या प्रतीक्षेत आहेत.़ असलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे या गावांमधे रिक्षा घेऊन जाणेही जोखमीचे होते. गावामधे एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला खाजगी वाहनाने घेऊन जाण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था पाहिली की, या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे जीवघेणे वाटते. या रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था रस्त्यांची झालेली आहे.
या सर्व गावांमधे प्राथमिक शाळा आहेत़ मात्र, यांना माध्यामिक शिक्षणासाठी परीसरातील मध्यवर्ती ठिकाणी देव्हारे येथे यावे लागते. एस. टी. नसल्याने या गावांमधील विद्यार्थ्यांना देव्हारेपासूनचे अंतर पायी चालत जावे लागते. त्याचबरोबर बाजारासाठी येणाऱ्या ग्रामस्थांनाही पायी चालत जाण्या येण्याशिवाय पर्याय उरत नाही़ (वार्ताहर)

Web Title: The rural areas of Mandangad taluka are neglected ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.