शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील पाणीटंचाई रोखण्यासाठी पावणेसहा कोटी रुपये मंजूर, टंचाई आराखडा निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:26 IST

केंद्र शासनाच्या हर घर जलसे नल या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली

रत्नागिरी : गाव, वाडी, वस्त्यांवर जलजीवन योजना राबवण्यात येत असल्याने त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे पाणीटंचाई कृती आराखडा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. अजूनही काही ३९५ वाड्यांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता असून, तेथील उपाययोजनांसाठी शासनाकडून ५ कोटी २२ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. टंचाई कृती आराखड्यातील विविध कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील २५७ गावातील ३९५ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी ५ कोटी ७३ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा परिषदेकडून शासनाला सादर करण्यात आला होता. हाच आराखडा गतवर्षी सुमारे १२ कोटी रुपयांचा होता. दरवर्षी डिसेंबर महिन्यात हा आराखडा तयार करुन तो प्रशासनाला सादर करण्यात येतो.

मात्र, यंदा  तालुकास्तरीय  आराखडे येण्यास विलंब झाला. त्यातही मंडणगड, खेड या तालुक्यातून आराखडा उशिरा आला. त्यामुळे जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यास विलंब झाला. त्यानंतर हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.टंचाईवर मात करण्यासाठी या आराखड्यात जिल्हा परिषदेने काही कामे सुचवली आहेत. त्यात जिल्ह्यात २५५ नवीन विंधन विहिरी बांधण्यात येणार आहेत. नळ दुरुस्तीची १७ कामे करण्यात येणार असून, ३४ विहिरीतील गाळ उपसा करण्यात येणार आहे. टंचाईग्रस्तांसाठी तात्पुरत्या दोन पूरक नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार आहेत. तर संभाव्य ९९ गावातील  २७९ वाड्यांना  ३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी ७४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.जिल्ह्यात तब्बल ७०० कोटी रुपयांची कामे सुरूकेंद्र शासनाच्या हर घर जलसे नल या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ७०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे वाड्या, वस्त्यांवर पाणी पुरवठा योजना नेण्यात येत असल्याने ही कामे सुरु झाली आहेत. त्या परिणाम चांगला झाला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईच्या आराखड्यामध्ये कपात झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी