राजापुरातील कामांसाठी दोन कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST2021-09-21T04:35:16+5:302021-09-21T04:35:16+5:30

राजापूर : अतिवृष्टीमुळे राजापूर नगर परिषद हद्दीतील नुकसान झालेल्या विकासकामांना निधी मिळण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ ...

Rs 2 crore sanctioned for works in Rajapur | राजापुरातील कामांसाठी दोन कोटी रुपये मंजूर

राजापुरातील कामांसाठी दोन कोटी रुपये मंजूर

राजापूर : अतिवृष्टीमुळे राजापूर नगर परिषद हद्दीतील नुकसान झालेल्या विकासकामांना निधी मिळण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्तावित केलेल्या राजापूर नगर परिषद हद्दीतील रुपये २ कोटी विकासकामांना विशेष अनुदान योजनेंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विविध विकासकामांचा शिवसेनेचे गटनेते विनय गुरव व नगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्या माध्यमातून विकासकामांचा आढावा घेत आमदार साळवी यांनी अत्यावश्यक कामांमधील मंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जवाहर चौक ते वरची शिवाजी पथ रस्ता काँक्रिटिंग करणे रु. १.५० लाख, राजापूर बौध्दवाडीतील सतीश जाधव घराजवळील कोसळलेली नगर परिषद रस्त्याची संरक्षक भिंत व जवाहर चौक पूल ते आंबेवाडी जॅकवेलपर्यंतचा रस्ता या कामांसाठी रु. २५ लाख, नगर परिषद हद्दीतील गुरववाडी विभागातील नागरिकांच्या वापरातील गणेश विसर्जन घाट दुरुस्त करण्याच्या कामासाठी रु. २५ लाख या कामांना शासनाची मंजुरी मिळाली आहे.

Web Title: Rs 2 crore sanctioned for works in Rajapur