घरपट्टी विभाग कर्मचाऱ्याचा उद्धटपणा

By Admin | Updated: January 15, 2015 23:32 IST2015-01-15T21:26:14+5:302015-01-15T23:32:53+5:30

मध्यस्तीनंतर तोडगा, काही काळ वातावरण तप्त

The roughness of the property department staff | घरपट्टी विभाग कर्मचाऱ्याचा उद्धटपणा

घरपट्टी विभाग कर्मचाऱ्याचा उद्धटपणा

चिपळूण : शहरातील एका करदात्याला जादा घरपट्टी आल्याने ती कमी करुन देण्यात यावी, या मागणीसाठी संबंधित नगर परिषदेचे उंबरठे झिजवत असून, कर्मचाऱ्याकडूनच उद्धटपणाची वागणूक मिळाल्याने काही काळ वातावरण तापले. हा प्रकार आज बुधवारी दुपारी घडला. नगर परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने यावर पडदा पडला. शहरातील आफ्रिन पार्क येथील महिमतुले यांची गेल्यावर्षीची घरपट्टी जादा आकारण्यात आल्याने त्यांनी घरपट्टी विभागात ही घरपट्टी कमी करुन मिळावी, यासाठी रितसर अर्ज केला आहे. या अर्जानंतर संबंधित प्रभागाचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. मात्र घरपट्टी कमी करुन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याबाबत पुन्हा विचारणा करण्यात आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. करदात्यास कर्मचाऱ्याने शिवीगाळ केल्याने गोंधळ उडाला. घरपट्टी विभागातील अधिकारी वर्ग ग्राहकाशी नम्र वागत असून, कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा वाढत असल्याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे. नगर परिषदेतील काही कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यास समजावण्याचा प्रयत्न केला. यावर मात्र करदात्याचे समाधान झाले नसून, झाल्या प्रकाराबाबत मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी दर्शविली आहे. प्रभारी मुख्याधिकारी जयंत जावडेकर याप्रकरणी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)

Web Title: The roughness of the property department staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.