आंजर्ले येथे खड्डयांमुळे रस्त्याची वाताहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:02+5:302021-07-02T04:22:02+5:30

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असून, या योजनेच्या ठेकेदाराने पाऊस सुरु होण्याअगोदर पाईपलाईन ...

Road congestion due to potholes at Anjarle | आंजर्ले येथे खड्डयांमुळे रस्त्याची वाताहात

आंजर्ले येथे खड्डयांमुळे रस्त्याची वाताहात

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असून, या योजनेच्या ठेकेदाराने पाऊस सुरु होण्याअगोदर पाईपलाईन टाकण्यासाठी या गावातील उभागर आळी येथे जेसीबीने खड्डे खणले होते. हे खड्डे योग्यरितीने न बुजविल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना अवजड वाहनांची चाके यात फसत आहेत. या खड्डयामुळे दापोली - आंजर्ले - पाडलेमार्गे केळशी ही बस या मार्गावरून बंद करण्यात आली होती. अखेर रस्त्याच्या डागडुजीनंतर सोमवारी ती पुन्हा सुुरु करण्यात आली.

तालुक्यातील आंजर्ले गावात पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून, पावसापूर्वी गावातील उभागर आळी येथे पाईपलाईन टाकण्यासाठी चर मारण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी जेसीबीने चर न मारता कामगारांकडून चर मारून घेतल्यास रस्त्याचे नुकसान कमी होईल, असे सांगितले होते. मात्र, ठेकेदाराने त्यांचे ऐकले नाही व जेसीबीच्या दीड फूट बकेटच्या सहाय्याने चर मारले. त्यामुळे आधीच हा रस्ता अरुंद त्यात जेसीबीने चर मारल्याने या आळीतील चांगल्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

ठेकेदाराने पाईपलाईन टाकल्यावर जेवढी माती खणली होती तेवढीच टाकून हे चर बुजवले होते. मात्र, पावसात माती खाली गेल्याने या अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना मोठ्या गाड्यांचे टायर या खड्डयात फसत आहेत. खड्डयात फसलेली वाहने काढताना चालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Road congestion due to potholes at Anjarle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.