आरकेपी काजूला कृषिमाल प्रक्रिया पुरस्कार

By Admin | Updated: July 9, 2014 00:27 IST2014-07-09T00:22:14+5:302014-07-09T00:27:29+5:30

राज्यातील कृषीक्षेत्रातील प्रतिक्षेष्ठेचा पुरस्कार

RKP Kajula Krishimali Manas Pisya Award | आरकेपी काजूला कृषिमाल प्रक्रिया पुरस्कार

आरकेपी काजूला कृषिमाल प्रक्रिया पुरस्कार

लांजा : राज्याच्या कृषिक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘वसंतराव नाईक कृ षी पुरस्कार’ यावर्षी गवाणे (ता. लांजा) येथील रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेला मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते समारंभपूर्वक संस्थेला नुकताच प्रदान करण्यात आला. संस्थेच्या आजवरच्या यशस्वी कारकिर्दीत या पुरस्काराने संस्थेच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या १०१व्या जन्मदिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक कृ षी पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, १ जुलै रोजी मुंबई, नरिमन पॉर्इंट येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. राज्याच्या कृषिक्षेत्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या राज्यातील मोजक्या संस्थांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
कृषी क्षेत्राशी संबंधित फलोत्पादन, उत्पादननिर्यात, भाजीपाला उत्पादन, फुलशेती, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जलसंधारण, कृ षीमाल प्रक्रिया, उद्योग या क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या संस्थांचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. यासाठी या संस्थांचे त्यांच्या कृषी क्षेत्राशी संबंधित कामगिरीचा विचार केला जातो. या सर्व मापदंड व निकषांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गवाणे येथील रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेची निवड झाली असून कोकणामध्ये या पुरस्कारासाठी निवड झालेली एकमेव संस्था आहे.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे चेअरमन जयवंत विचारे, उपाध्यक्ष अशोक बोरकर,सुरेंद्र खानविलकर, महेंद्र जाधव, शंकर सुर्वे, प्राजक्ता खानविलकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्विकारला. यावेळी मंत्री व कोकणातील अनेक हितचिंतक उपस्थित होते.
यावेळी विचारे यांनी आरके कोकणने केलेल्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकला व त्यानी यापुढे अशा व्यवसायात तरूणांनी उतरावे असे आवाहन केले. या पुरस्काराबद्दल कृषीक्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांचे ्अभिनंदन केले. (प्रतिनिधी)

Web Title: RKP Kajula Krishimali Manas Pisya Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.