शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीतील ‘या’ गावातून वाहते चक्क वाफाळलेली नदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 06:35 IST

कोकणातील ‘मिनी महाळेश्वर’ अशीच दापोलीची खरं तर ओळख. या तालुक्यात हुडहुडी भरवणारी थंडीही पडते आणि धो-धो पाऊसही पडतो. याच तालुक्यात ही गरम पाण्याची नदी मात्र अखंडपणे वाहते आहे.

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : खरं तर साध्या पाण्याची नदीही वर्षभर वाहताना दिसत नाही. पण दापोली तालुक्यातील एका गावात मात्र वर्षभर वाफाळलेल्या पाण्याची नदी वाहते. विश्वास नाही ना बसत? पण हे खरं आहे. दापोली तालुक्यातील उन्हवरे या गावात चक्क वाफाळलेली नदी वाहत आहे. हे पाणी गंधकमिश्रित असल्याने ते गरम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल आठ ठिकाणी अशी गरम पाण्याची कुंडे आहेत. 

कोकणातील ‘मिनी महाळेश्वर’ अशीच दापोलीची खरं तर ओळख. या तालुक्यात हुडहुडी भरवणारी थंडीही पडते आणि धो-धो पाऊसही पडतो. याच तालुक्यात ही गरम पाण्याची नदी मात्र अखंडपणे वाहते आहे. दापोली शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर उन्हवरे हे गाव नदीच्या काठावर वसलेले आहे. याच ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत. या कुंडामुळे हे ठिकाण नावारूपाला आले आहे. गरम पाण्याच्या कुंडातील पाण्याचे तापमान ७० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. या कुंडातील पाणी झऱ्याच्या रूपाने वाहत असून, या वाहत जाणाऱ्या पाण्यामुळे सुमारे १० किलोमीटरची वाफाळलेली नदीच तयार झाली आहे. या वाफाळलेल्या नदीत पाय घातल्यास नक्कीच चटका बसतो. जमिनीतून वर येणाऱ्या या पाण्यात गंधकाचे प्रमाण अधिक आहे.उन्हवरे याठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहे. निसर्गात ढवळाढवळ न करता येथे विकास केला पाहिजे. या गरम पाण्यामुळे आजूबाजूच्या जमिनीवर कोणताच परिणाम होत नाही. गंधक पाण्यात मिसळत असल्याने ते गरम होते. - सुधीर रिसबूड, इतिहास संशोधक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी