क्रिकेट स्पर्धेत ए- रायझिंग स्टार संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST2021-03-18T04:31:03+5:302021-03-18T04:31:03+5:30

असगोली : गुहागर तालुक्यातील वरवेली येथील तरुण उत्साही मंडळाच्यावतीने श्री काशी विश्वेश्वर मंदिरातील महाशिवरात्रीनिमित्त आयोजित वरवेली तेलीवाडी प्रीमियम ...

A-Rising Star team winners in cricket | क्रिकेट स्पर्धेत ए- रायझिंग स्टार संघ विजेता

क्रिकेट स्पर्धेत ए- रायझिंग स्टार संघ विजेता

असगोली :

गुहागर तालुक्यातील वरवेली येथील तरुण उत्साही मंडळाच्यावतीने श्री काशी विश्वेश्वर मंदिरातील महाशिवरात्रीनिमित्त आयोजित वरवेली तेलीवाडी प्रीमियम लीग अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत संघमालक आकाश किर्वे यांचा ए - रायझिंग स्टार संघ विजेता ठरला असून, प्रणित किर्वे यांच्या पी. के. स्ट्रायकर्स संघाला उपविजेतेपद मिळाले.

विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. दिवस - रात्र झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन तरुण उत्साही मंडळाचे अध्यक्ष दशरथ किर्वे, सचिव प्रभाकर किर्वे, पत्रकार गणेश किर्वे, दीपक किर्वे, बळीराम पवार, संतोष किर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले. या स्पर्धेमध्ये मालिकावीर आकाश किर्वे, उत्कृष्ट गोलंदाज प्रतीक विचारे, उत्कृष्ट फलंदाज सुदीप रसाळ, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रणित किर्वे, सामनावीर म्हणून ऋतिक किर्वे यांना सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी पंच म्हणून समीर महाडिक, संतोष किर्वे, आकाश किर्वे, प्रवीण किर्वे यांनी काम पाहिले. समालोचन गिरीधर रांजाणे, प्रसाद विचारे यांनी केले.

.................

फोटो आहे.

गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील स्पर्धेमध्ये आकाश किर्वे यांच्या ए- रायझिंग स्टार संघाला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

Web Title: A-Rising Star team winners in cricket