रिक्षा चोरणारा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST2021-06-21T04:21:34+5:302021-06-21T04:21:34+5:30

देवरुख : महामार्गावर उभी करून ठेवलेली रिक्षा चोरून घेऊन जाणारा चोरटा ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्याला संगमेश्वर पोलिसांनी ...

Rickshaw thief arrested | रिक्षा चोरणारा ताब्यात

रिक्षा चोरणारा ताब्यात

देवरुख : महामार्गावर उभी करून ठेवलेली रिक्षा चोरून घेऊन जाणारा चोरटा ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्याला संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. राजू मुकुंद पातले (३९, रा. सौंदाले, रा. देवगड सिंधुदुर्ग) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

संगमेश्वर पोलीस स्थानकातून याबाबतची माहिती विजय पवार यांनी दिली आहे. विजय पवार यांच्या राहत्या घराजवळ रिक्षा (एमएच ०८, एक्यू ४३५९) उभी करून ठेवलेली हाेती. ही रिक्षा बाहेर काढून ढकलत नेण्याच्या प्रयत्नात राजू पातले हाेता. हा प्रकार रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर विजय पवार यांना माहिती दिली. त्यानंतर त्या चोराला ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. यावरून राजू याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७९,५११ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक तांबडे करीत आहेत.

Web Title: Rickshaw thief arrested