वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:31 IST2021-05-14T04:31:19+5:302021-05-14T04:31:19+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील घोडवली फाटा येथे बुधवारी रिक्षा पलटी होऊन एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. अपघातातील मृत्यूस कारणीभूत ...

वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील घोडवली फाटा येथे बुधवारी रिक्षा पलटी होऊन एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. अपघातातील मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रिक्षाचालक संदीप श्रीपत गावडे याच्याविराेधात देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप धावडे हा आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८, एक्यू ४०४३) घेऊन पांगरी धारेखालची वाडी येथील गणपत दत्ताराम म्हादे यांना बुधवारी सकाळी दवाखान्यात घेऊन गेला होता. दवाखान्यातून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या डम्परला बाजू देताना रिक्षाचे समोरील चाक खड्ड्यात गेल्याने रिक्षा पलटी झाली. यात गणपत रामा म्हादे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रत्नागिरी येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घाेषित केले़ तर गणपत दत्ताराम म्हादे जखमी झाले आहेत़ याप्रकरणी अधिक तपास हेड कॉन्स्टेबल बाणे करीत आहेत.