पासपोर्ट कार्यालय पुन्हा रत्नागिरीत करा
By Admin | Updated: November 8, 2015 23:36 IST2015-11-08T23:10:34+5:302015-11-08T23:36:36+5:30
काँग्रेस अल्पसंख्यांक सेल : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

पासपोर्ट कार्यालय पुन्हा रत्नागिरीत करा
रत्नागिरी : येथून मुंबई येथे हलविण्यात आलेले पासपोर्ट कार्यालय रत्नागिरीत पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले.
पासपोर्ट कार्यालय मुंबई येथे गेल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील हज यात्रेला जाणाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांना शारीरिक, मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा होणारा त्रास दूर करून पासपोर्ट कार्यालय पुन्हा रत्नागिरीत सुरू करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांचे नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी जर पासपोर्ट कार्यालय रत्नागिरीत सुरू करणे शक्य नसेल तर किमान दोन महिन्यांनी १० दिवसांचा कॅम्प लावणेबाबत जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी ही आपली अडचण दूर करू, असे आश्वासन दिले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रशीद साखरकर, शकील गवाणकर, सुहेल मुकादम, अंजुम रावल, सिकंदर खान, आतिफ साखरकर, खालीद तांबे, निसार बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पासपोर्ट कार्यालय मुंबईत हलवल्याने हज यात्रेकरुंचे हाल.
किमान दोन महिन्यांनी कॅम्प लावण्याचे आवाहन.