महिला बचतगटांची उमेद वाढवणारा प्रतिसाद Synopsis*
By Admin | Updated: October 24, 2015 00:50 IST2015-10-23T21:31:01+5:302015-10-24T00:50:52+5:30
खाद्यपदार्थ स्पर्धा : राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

महिला बचतगटांची उमेद वाढवणारा प्रतिसाद Synopsis*
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणातर्फे आयोजित बचत गटांसाठीच्या खाद्यपदार्थ स्पर्धेला जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
साळवी स्टॉप- नाचणे रोड येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय आयोजित स्पर्धा आणि प्रदर्शनात जिल्ह्यातील ५०पेक्षा जास्त बचत गट सहभागी झाले होते. पालकमंत्री रवींद्र वायकर यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील बचत गटांच्या खाद्यपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे बचत गटांची उत्पादने विविध माध्यमांतून ग्राहकांसमोर मांडून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रदर्शनादरम्यान आयोजित सत्रात उपस्थित बचत गट सदस्यांना पॅकेजिंंग व मार्केटिंग बाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
स्पर्धेमध्ये बचत गटांकडून दिवाळीचा फराळ, कोकणी पदार्थ, सरबत, ज्यूस, पापड, लोणचे, विविध प्रकारचे पीठे व मसाला अशा प्रकारचे अस्सल कोकणी स्वादाचे पदार्थ सादर करण्यात आले होते. नागरिकांनीदेखील या खाद्यपदार्थांच्या प्रदर्शनास प्रतिसाद देऊन आपल्या आवडीच्या पदार्थांची (दिवाळी फराळ व इतर) प्रत्यक्ष पाहणी करुन खरेदीसाठी बचत गटाकडे आॅर्डर नोंदवल्या. समारोपप्रसंगी प्रदर्शनात सहभागी बचत गटांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत गौरवण्यात आले.
प्रदर्शनात सकाळच्या सत्रात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बचत गटांच्या उत्पादनांची पाहणी केली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विवेक पनवेलकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)