‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST2021-04-20T04:32:28+5:302021-04-20T04:32:28+5:30
रत्नागिरी : राष्ट्रवादी युवक बेसिक, विद्यार्थी आणि सर्व सेल्सतर्फे साेमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ या टॅगलाइनखाली ...

‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ रक्तदान शिबिराला प्रतिसाद
रत्नागिरी : राष्ट्रवादी युवक बेसिक, विद्यार्थी आणि सर्व सेल्सतर्फे साेमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ या टॅगलाइनखाली रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून आयोजित केलेल्या या शिबिराला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, युवकचे प्रदेश सचिव बंटी सदानंद वणजू, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, जिल्हा सरचिटणीस बबलू कोतवडेकर, शहर अध्यक्ष नीलेश भोसले, युवक जिल्हा उपाध्यक्ष पप्पू तोडणकर, युवक विधानसभा क्षेत्राध्यक्ष संकेत देसाई, शहर युवक अध्यक्ष मंदार नैकर, जिल्हा विद्यार्थी उपाध्यक्ष संकेत कदम, तालुका विद्यार्थी अध्यक्ष सूरज शेट्ये, विद्यार्थी शहर अध्यक्ष साईजीत शिवलकर, नितीन रोडे, रुपेश आडिवरेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनी कोरोना महामारीत बाधित झालेल्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदान जवळच्या रक्तदान शिबिरात किंवा रक्तपेढीत करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले आहे.
या शिबिरात बंटी सदानंद वणजू, बबलू कोतवडेकर, रूपेश आडिवरेकर, साईजीत शिवलकर, मंदार नैकर, परिमल खेडेकर, संकेत कदम, विक्रांत भोसले, प्रल्हाद शिंदे, निखिल मुळे, नितीन रोडे, रोहित ओसवाल, सुखदेव मारगुडे, अमित आग्रे, शुभम धामणस्कर, सूरज दळवी, अपूर्वा मुरकर, सौरभ वायंगणकर, प्रवीण आंबेकर, दिप्तेश मोंडे, आकाश वडार, अभिषेक आंबेकर, विनोद गवाणकर, राजेश भारती, जालिंदर कोकरे आदींनी रक्तदान केले.