मोसम नदीच्या अस्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये संताप
By Admin | Updated: August 11, 2014 21:59 IST2014-08-11T21:21:25+5:302014-08-11T21:59:40+5:30
मोसम नदीच्या अस्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये संताप

मोसम नदीच्या अस्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये संताप
संगमेश्वर : मोसम नदीच्या अस्वच्छतेबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी टाकलेला प्रकाशझोत व जनमताच्या रेट्यामुळे मालेगाव महानगरपालिकेने पाणवेली काढण्यास सुरुवात केली; मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधींची पाठ फिरताच काम बंद झाल्याचे विदारक चित्र काल येथे दिसून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
महानगरपालिकेचे जेसीबी यंत्र खराब असल्याचे कारण देऊन स्वच्छता मोहिमेस आधीच उशीर झाला होता. काल दुसऱ्या जेसीबी यंत्राद्वारे पाणवेली काढण्यास सकाळी सुरुवात झाली. मात्र काही वेळातच जेसीबी चालकाला कामच करता येत नसल्याचे कारण देत हे काम बंद पाडले. कारण देऊन जेसीबी यंत्र माघारी फिरले. नागरिकांच्या आनंदावर विरजण पडल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच शनिवारपासून शहरात पुन्हा विजेचे भारनियमन सुरू झाले आहे. सकाळी तीन तास तर सायंकाळी ५ ते ८ या तीन तासात वीज गायब होत आहे. याचवेळी डास मच्छरांचे आगमन होते आणि नागरिकांना या डास-मच्छरांना तोंड देता देता अक्षरश: नाकीनऊ येते. संगमेश्वर नदीकिनारी प्रत्येक घर, दुकानांसमोर धूर करून नागरिक वीज येण्याची वाट बघत होते.
आगामी सण-वार लक्षात घेता बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी अपेक्षित असते. मात्र विजेचे भारनियमन व डासांचा हमला यामुळे महिला, मुले कशीबशी खरेदी पटकन आटोपून या भागातून पळ काढताना दिसत होते. (वार्ताहर)
पिंपळगावी दुबार पेरणीचे संकट
पिंपळगाव वाखारी : खरीप हंगामातील बाजरीच्या पिकाची दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पाऊस उशिरा आल्याने परिसरात शेतकऱ्यांनी अत्यल्प ओलीवर खरिपाची पेरणी केली. खरीप पिकांतील बाजरीची उगवणी असमाधानकारक असून, उगवलेली बाजरीचे कोंब मरत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे़