शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंबा पिकावरील फूलकिडे नियंत्रणासाठी संशोधन सुरू : डॉ. व्ही. एन. जालगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 12:52 IST

रत्नागिरी : गेली चार-पाच वर्षे आंबा बागायतदार तुडतुड्यासह फूलकिडे (थ्रीप्स) प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. विविध कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स आटोक्यात येत ...

रत्नागिरी : गेली चार-पाच वर्षे आंबा बागायतदार तुडतुड्यासह फूलकिडे (थ्रीप्स) प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. विविध कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स आटोक्यात येत नाही. तुडतुडे आणि फूलकिड्यांच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठामध्ये संशोधन सुरू असून, लवकरच योग्य उपाययोजनाबाबतची माहिती बागायतदारांना देऊ, असे आश्वासन डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञ विभागाचे प्रमुख डाॅ. व्ही. एन. जालगावकर यांनी दिले.रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे रविवारी आंबा बागायतदारांसाठी रत्नागिरीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डाॅ. जालगावकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डाॅ. महेश कुलकर्णी, जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, मंदार सरपोतदार उपस्थित होते.डाॅ. जालगावकर यांनी सांगितले की, अति कीटकनाशकांचा वापर, सातत्याने कीटकनाशकांची फवारणी, दोन ते तीन कीटकनाशक एकाचवेळी वापरल्यामुळे कीडरोग नियंत्रणात येत नाही. काही ठिकाणी थ्रीप्स आटोक्यात आला नाही किंवा त्याने नुकसानही केल्याचे दिसले नाही. फूलकिडे नियंत्रणाबाबत सध्या विद्यापीठात संशोधन सुरू आहे. गतवर्षीच्या हंगामात काही आंबा बागेत प्रात्यक्षिके घेण्यात आली. १५ दिवसांच्या फरकानंतर विशिष्ट कीटकनाशकांच्या फवारण्या करण्यात आल्या. काही झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचेल, असे कीटकनाशक पाण्यातून देण्यात आली. त्याचा वापर प्रभावी ठरल्याचे त्यांनी सांगितले. फळमाशीसाठी रक्षक सापळा वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.डाॅ. महेश कुलकर्णी म्हणाले की, आंबा बागेतील प्रत्येक झाडाच्या पानावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे. योग्य उष्णता असेल, तर झाडावरील कीडरोगाचे प्रमाण कमी होईल. अन्यथा वेळच्या वेळी फांद्यांची छाटणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या उत्तरार्धात बागायतदारांना फवारणीसाठी ड्रोनचा वापर करून त्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. मंदार सरपोतदार यांनी या कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले.

गोगलगायींचा प्रादुर्भावसध्या गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याबाबतचेही संशोधन पूर्णत्वाकडे असल्याचे डाॅ. जालगावकर यांनी सांगितले. सध्या तरी गोगलगायी एकत्र करून युरियाच्या पाण्यात टाकण्याची सूचना त्यांनी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाfarmingशेतीResearchसंशोधन