देवरुखात आज हनुमान मंदिराचा जीर्णाेद्धार

By Admin | Updated: April 21, 2016 18:40 IST2016-04-21T18:30:26+5:302016-04-21T18:40:36+5:30

सकाळी कलश मिरवणूक काढण्यात येणार

Repossession of the temple of Hanuman today in Devrukhand | देवरुखात आज हनुमान मंदिराचा जीर्णाेद्धार

देवरुखात आज हनुमान मंदिराचा जीर्णाेद्धार

देवरुखात आज हनुमान मंदिराचा जीर्णाेद्धार
देवरुख : पर्शुरामवाडी येथे हनुमान जयंतीनिमित्त श्री हनुमान मंदिर जीर्णाेद्धार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्शरामवाडी येथे यावर्षी हनुमान जयंती सोहळा हा आगळ्यावेगळ्या स्वरुपात साजरा केला जाणार आहे. जिर्णाेद्धार सोहोळ्यानिमित्त २१ व २२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ रोजी सकाळी कलश मिरवणूक काढण्यात येणार असून, यावेळी आमदार सदानंद चव्हाण उपस्थित राहणार आहेत. दुपारी कलशारोहण होणार आहे.
२२ रोजी सकाळी हनुमान जन्मोत्सव, सत्यनारायण महापूजा तर दुपारी महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी होणाऱ्या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाला आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने, नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, सभापती हर्षदा डिंगणकर, उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, छोट्या गवाणकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार, नगरसेवक नंदादीप बोरुकर, अश्विनी सावंत, मिताली तळेकर, वैभवी पर्शुराम उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्री चरवेली येथील नमन होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष तुकाराम लाड, उपाध्यक्ष दत्ताराम पर्शराम यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Repossession of the temple of Hanuman today in Devrukhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.