रस्ता दुरुस्त करा, अन्यथा खड्डयातच वृक्षाराेपण करू : माेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST2021-06-29T04:21:53+5:302021-06-29T04:21:53+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन करजुवे मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यातून प्रवास करताना प्रवाशांना जीव धोक्यात ...

रस्ता दुरुस्त करा, अन्यथा खड्डयातच वृक्षाराेपण करू : माेरे
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन करजुवे मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यातून प्रवास करताना प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा, अन्यथा खड्ड्यामध्येच वृक्षाराेपण करू, असा इशारा मावळंगे शिवसेना शाखाप्रमुख बाबू मोरे यांनी दिला आहे.
मागील अनेक महिन्यांपासून या मार्गावर वाळूची अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू होती. तसेच पावसाळ्यापूर्वी या मार्गालगतचे नाला व मोऱ्या साफ न झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन रस्त्याला मोठे खड्डे पडले हाेते. रात्रीच्या वेळी हा मार्ग अधिकच धोकादायक ठरत आहे. धामापूर रामनवाडी येथे जांगलदेव मंदिराजवळ दोन वर्षांपासून मोरीसह रस्ता खचला आहे. आजही त्याठिकाणी दुरुस्ती केलेली नाही.
रात्रीच्या वेळी या ठिकाणी दुचाकीस्वारांचा अपघात घडला आहे. निमरीजवळ रस्त्याच्या बाजूचा डोंगराचा भाग खाली आल्याने रस्त्याची वाहतूक काही वेळ थांबली गेली होती. बांधकाम विभागाने तत्काळ याकडे लक्ष देऊन या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.