पुलाच्या पिलरची डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:09+5:302021-09-18T04:35:09+5:30
चिपळूण : तालुक्यातील गणेशखिंड-सावर्डे-दुर्गवाडी-तळवडे रस्त्यावरील डेरवण रुग्णालयाच्या परिसरातील पुलाच्या पिलरचा पाया ढासळला आहे. त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. संबंधित ...

पुलाच्या पिलरची डागडुजी
चिपळूण : तालुक्यातील गणेशखिंड-सावर्डे-दुर्गवाडी-तळवडे रस्त्यावरील डेरवण रुग्णालयाच्या परिसरातील पुलाच्या पिलरचा पाया ढासळला आहे. त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. संबंधित विभागाने त्याची दखल घेत पुलाच्या एका पिलरची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे.
शिक्षण विभाग प्रभारींच्या हाती
खेड : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार गेल्या अडीच वर्षापासून प्रभारींच्या हातात असून, प्रभारी हीच परंपरा आजपर्यंत कायम आहे. सुमारे अडीच ते तीन वर्षांपासून खेड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारीपदी श्रीधर शिगवण हे काम पाहत आहेत.
विजेचा खेळखंडोबा थांबवा
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड या तीन तालुक्यातील विजेचा खेळखंडोबा थांबवून कोकणवासीयांना दिलासा देण्याची मागणी लेखी निवेदनातून एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बामणोलीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
चिपळूण : तालुक्यातील बामणोली येथील ८ वाड्यांमधील गरीब व गरजूंना मुंबई येथील दीप जनसेवा समितीच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व साड्यांचे वाटप करण्यात आले. बामणोली येथे मजूर मोठ्या प्रमाणात राहतात. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
मार्ग बनलाय पार्किंग झोन
चिपळूण : येथील मध्यवर्ती बसस्थानक ते वीरेश्वर तलाव दरम्यानचा अंतर्गत मार्ग सध्या पार्किंग झोनच बनला आहे. कायम रहदारी असणाऱ्या या मार्गावर खासगी बसेसबरोबरच चारचाकी वाहने राजरोसपणे उभी करून ठेवली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.