राजकारण कराल तर याद राखा : कदम

By Admin | Updated: October 5, 2015 00:16 IST2015-10-04T21:51:11+5:302015-10-05T00:16:22+5:30

खेडमध्ये ५ तालुक्यातील जनतेसाठी शनिवारी भरणे येथील पाटीदार भवन येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

Remember if you do politics: move | राजकारण कराल तर याद राखा : कदम

राजकारण कराल तर याद राखा : कदम


खेड : खेडसह संपूर्ण रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह संपूर्ण ग्रामपचांयती शिवसेनेच्या अधिपत्याखाली असताना जातीपातीच्या भिंती निर्माण करून शिवसेनेमध्ये समाजाचे राजकारण करण्यात आले. असं काय कारण घडलं, असा सवाल उपस्थित करीत समाजाचे राजकारण कराल तर याद राखा, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला.यावेळी त्यांचा रोख होता तो केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्याकडेच! राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या अशा धेंडांना दया दाखवू नका, असे आवाहन कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले़
शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या वतीने खेडमध्ये ५ तालुक्यातील जनतेसाठी शनिवारी भरणे येथील पाटीदार भवन येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामदास कदम यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. खेडमध्ये अनंत गीते आणि रामदास कदम यांच्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून विस्तव जात नाही. त्यांच्यातील राजकीय मतभेद आता विकोपाला गेले आहेत. याच पार्श्वभूमीेवर कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गीते यांचे नाव न घेता त्यांच्या दिशेने प्रहार केला. समाजाचे राजकारण करणाऱ्यांची यापुढे गय करणार नाही, असेही ते म्हणाले.यावेळी रवींद्र वायकर, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, खेड पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, खेडचे तालुकाप्रमुख राजा बेलोसे, खेडचे शहरप्रमुख संजय मोदी उपस्थित होते. पालकमंत्री वायकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कदम यांनी विशेष कौतुक केले. लोकोपयोगी उपक्रम राबवणारे वायकर हे खरेखुरे सेवाव्रती आहेत, असे ते म्हणाले. वंचित शेतकऱ्यांसह इतर लोकांनाही कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांनी वितरण केलेल्या रोख रक्कम आणि धान्याचा यावेळी रामदास कदम यांनी विशेष उल्लेख केला. दापोलीचे किशोर देसाई यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा उल्लेख करीत देसाई यांना लवकर आठवण झाल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Remember if you do politics: move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.