रुग्ण घटल्याने लांजाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST2021-05-21T04:32:26+5:302021-05-21T04:32:26+5:30

लांजा : गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. बुधवारी एकूण २० जणांचे ...

Relieve Lanza as the patient falls | रुग्ण घटल्याने लांजाला दिलासा

रुग्ण घटल्याने लांजाला दिलासा

लांजा :

गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. बुधवारी एकूण २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाने दोघांचा बळी घेतला आहे.

बुधवारी करण्यात आलेल्या अँटिजन कोरोना चाचणीत ५ जण तर आरटीपीसीआर कोरोना अहवालात १५ जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये लांजा शहरात ९, लांजा आगरवाडीत २, लांजा धावनेवाडीत २, तर लांजा पोलीस वसाहत, लांजा बसस्थानकाच्या मागे, माजळ, वाडीलिंबू, कुवे निवळेवाडी, वाकेड मावळतवाडी, शिरवली या प्रत्येक ठिकाणी १ रुग्ण सापडला.

गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये दोघांचे कोरोनाने बळी गेले आहेत. तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्ण संख्या १,८९४ झाली आहे. त्यामधून १,४७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात ३३३ कोरोनाचे रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. आतापर्यंत एकूण ८३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

Web Title: Relieve Lanza as the patient falls