एकही रुग्ण न आढळल्याने लांजावासीयांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:47+5:302021-09-02T05:07:47+5:30
लांजा : ऑगस्ट महिन्यापासून तालुक्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट हाेत आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांबरोबरच ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये मोठी घट झाली ...

एकही रुग्ण न आढळल्याने लांजावासीयांना दिलासा
लांजा : ऑगस्ट महिन्यापासून तालुक्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट हाेत आहे. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांबरोबरच ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. त्यातच मंगळवारी अँटिजन व आरटीपीसीआर कोरोना अहवालात एकही रुग्ण आढळला नाही.
स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी अहोरात्र मेहनत घेऊन पाच महिन्यांच्या कालावधीनंतर काेराेनावर नियंत्रण मिळविले आहे. तालुक्यात कोरोना लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग मेहनत घेत आहे. मात्र, पुरेसा लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण करण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. याच्यावर मात करत सर्वांना लस मिळण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. तालुक्यात आतापर्यंत ३८४४ कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामधून ३७०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर सध्या तालुक्यात १६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.