शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुरातून सुटका, चिपळुणातील रस्त्यावरच्या पाण्याचा प्रश्न सुटेना!, वाहतूकदारांसह नागरिक हैराण

By संदीप बांद्रे | Updated: July 26, 2023 18:25 IST

नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी

चिपळूण : मुसळधार पावसामुळे बुधवारी दिवसभर चिपळूण शहर व परिसराला अक्षरशः झोडपले. मंगळवारी दुपारनंतर बाजारपेठ परिसरात रस्त्यावर आलेले पुराचे पाणीही निघून गेले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत व बुधवारी पहाटेही पाऊस धो धो कोसळत होता. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी होताच पुराचा धोका टळला. परंतु त्यानंतरही शहरातील काही मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही पावसाचे पाणी दिवसभर साचले होते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे मंगळवारी पुन्हा येथे काहीशी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहर व आजूबाजूचा परिसर मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात पाणी आले होते. मात्र ओहोटीमुळे पुराचा धोका टळला. परंतु या पावसामुळे बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही पाणी साचल्याने अनेकांना त्याचा फटका बसला. बुधवारी देखील पावसाचा जोर वाढतच राहील्याने काही रस्त्यावर एक ते दोन फूटापर्यंत पाणी होते. अनंत आईस फॅक्टरी व लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे नेहमीच पाणी साचत आहे.  तर मुरादपूर, पेठमाप व गोवळकोट परिसरातील अंतर्गंत रस्त्यांवर पाणी पातळी अधिक होती. मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालयासमोर देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. याशिवाय मिरजोळी साखरवाडी येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे देखील अनेकांना फटका बसला.गेल्या दोन दिवसात येथे २६० मिलिमीटर तर आतातपर्यंत एकूण २०७० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. परंतु अद्याप पावसाने २४ तासात २००मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. तरीही गाळ उपशामुळे वाशिष्ठी व शिवनदीच्या वहन क्षमतेत वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच बाजारपेठेत पुराचे पाणी शिरता शिरता थांबले आणि तूर्तास हा धोका टळला. त्यामुळे तीन दिवस मुसळधार पाऊस होऊन देखील चिपळूणकरांना पुराचा सामना करावा लागला नाही. मात्र आता चिपळूणकर वेगळ्याच विषयामुळे अडचणीत आले आहेत. ते म्हणजे रस्त्यावर साचत असलेल्या पाण्यामुळे काहींना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. शहरात काही ठिकाणी बांधकामांचे अतिक्रमण झाले असल्याने व काहींनी गाळ उपश्यानंतर त्याचा जागोजागी भराव टाकल्याने नैसर्गिक नाले तुंबू लागले आहेत. परिणामी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूकRainपाऊस