शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना दिलासा, कशेडीतील दुसरा बोगदाही मुंबईकरांसाठी खुला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 18:33 IST

मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर गती

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या घाटातील दुसरा बोगदा वाहतुकीस गुरुवारी (५ सप्टेंबर) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर वाढलेल्या वाहतुकीला थोडा दिलासा मिळाला आहे.गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत एका बोगद्यातून हलकी प्रवासी वाहने सोडण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा येथील वाहतूक बंद करण्यात आली. बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू होते. शिमगोत्सवादरम्यान २५ फेब्रुवारीपासून कशेडी बोगद्यातून कोकणात येणाऱ्या लहान वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. तब्बल एका वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदा यावर्षी गणेशोत्सव कालावधीसाठी वाहनांसाठी सुरू करण्यात आला असल्यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.गणेशोत्सवात महामार्गावर सातत्याने वाहतूककोंडी होते. त्यात कशेडी घाटात अधिक समस्या येतात. मात्र, आता प्रवाशांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. ४० मिनिटांचे अंतर फक्त १० मिनिटांत पार करता येणार आहे. सद्य:स्थितीत कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधण्यात येत असलेल्या दोन स्वतंत्र बोगद्यांपैकी मुंबईकडे जाणारा बोगदा येणाऱ्या व जाणाऱ्या अशा दोन्ही वाहनांसाठी वापरण्यात येत आहे. मात्र, नव्याने सुरू झालेल्या या बोगद्यात केवळ एकाच मार्गिकेचे काम पूर्ण झाले असल्यामुळे या बोगद्यातून आता कोकणात येणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर गतीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाच्या पाहणीनंतर दोन्ही बोगद्यांतून वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले हाेते. महामार्ग बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनीने कामाला वेग देऊन दुसऱ्या बोगद्यातील तीनपैकी एक मार्गिका सुरू केली आहे. यामुळे अवघड व धोकेदायक कशेडी घाटातील प्रवासातून चाकरमान्यांची सुटका झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४