शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: निवडणूक प्रचाराची मुदत वाढल्याने उमेदवारांना दिलासा, मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 16:03 IST

सध्या मिळेल तेवढा वेळ प्रचार करण्याकडे सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे अधिक लक्ष

रत्नागिरी : राज्यातील नगर परिषदा, नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची मुदत राज्य निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे ३० नोव्हेंबर राेजी रात्री १२ वाजेपर्यंत होती. मात्र, आता राज्य निवडणूक आयाेगाने प्रचाराची मुदत एक दिवसाने वाढवली असून, उमेदवारांना १ डिसेंबर रोजी (मतदानाच्या आदल्या दिवशी) रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे.निवडणूक आचारसंहितेच्या तरतुदीनुसार कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्याच्या दिनांकानुसार २४ तास अगोदर सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचार बंद करावा लागतो. नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तया अनुषंगाने रविवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर प्रचार बंद करावा लागणार होता.मात्र, राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीत प्रचारासाठी एक दिवस वाढवून दिला आहे. सुधारित आदेशानुसार सर्व उमेदवारांना मतदानाच्या आधी २४ तास प्रचार थांबविण्याऐवजी आदल्या दिवशी म्हणजेच १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. त्यानंतर मात्र, सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर कुठल्याही उमेदवाराला करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्धीही करता येणार नाही.राज्य निवडणूक आयोगाने प्रचारासाठी आणखी एक दिवस वाढवून दिल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांना प्रचारासाठी अधिक कालावधी मिळणार आहे. त्यामुळे सध्या मिळेल तेवढा वेळ प्रचार करण्याकडे सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे अधिक लक्ष लागून राहिले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Local Body Election: Campaign Deadline Extended, Relief for Candidates

Web Summary : Ratnagiri candidates get extra campaign time. Election commission extends deadline to December 1st, 10 PM. Candidates gain precious hours for final outreach.