राजन साळवी यांच्या रिफायनरी समर्थनाच्या ट्वीटबाबत विनायक राऊत म्हणाले..
By मनोज मुळ्ये | Updated: April 26, 2023 16:42 IST2023-04-26T16:41:52+5:302023-04-26T16:42:33+5:30
कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला पाठिंबा, असे ट्वीट राजापूरचे आमदार राजन साळवी केले आहे.

राजन साळवी यांच्या रिफायनरी समर्थनाच्या ट्वीटबाबत विनायक राऊत म्हणाले..
रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूभिका आपल्याला मान्य असेल, असे आमदार राजन साळवी यांनी याआधीच जाहीर केले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.
कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला पाठिंबा, असे ट्वीट राजापूरचे आमदार राजन साळवी केले आहे. माझ्या प्रकल्पग्रस्त नागरिकांना प्रशासनाने प्रकल्पाची बाजू पटवून द्यावी, त्यांच्यावर अन्याय करू नये, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
या ट्वीटबाबत खासदार राऊत म्हणाले की, यात प्रतिक्रिया देण्सारखे काही नाही. आमदार साळवी यांनी याआधीच रिफायनरीबाबत आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जी भूमिका घेतील ती आपल्याला मान्य असेल आणि तीच आपली भूमिका असेल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता त्याबाबत बोलण्सारखे काहीही नाही, असे राऊत म्हणाले.