शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, पण... : सामाजिक संस्था ठरताहेत चिमुकल्यांसाठी भाग्यविधात्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:29 IST

बालदिनाचा सोहळा वर्षातून केवळ नावापुरता करून वर्षभर वंचित बालकांच्या विकासाकडे शासन दुर्लक्ष करीत असले तरी सेवाभावी संस्था पदरमोड करीत अशा मुलांसाठी कार्य करीत असल्याने या मुलांना मायेची ऊब मिळतानाच त्यांचे आयुष्यही घडविली जात आहेत. या संस्था या मुलांची भाग्यविधाते ठरू लागल्या आहेत.

ठळक मुद्देशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, पण... : सामाजिक संस्था ठरताहेत चिमुकल्यांसाठी भाग्यविधात्याबालदिन विशेष : हरवलेल्या बालपणात बालगृहांमध्ये मायेचा आसरा

शोभना कांबळे 

रत्नागिरी : बालदिनाचा सोहळा वर्षातून केवळ नावापुरता करून वर्षभर वंचित बालकांच्या विकासाकडे शासन दुर्लक्ष करीत असले तरी सेवाभावी संस्था पदरमोड करीत अशा मुलांसाठी कार्य करीत असल्याने या मुलांना मायेची ऊब मिळतानाच त्यांचे आयुष्यही घडविली जात आहेत. या संस्था या मुलांची भाग्यविधाते ठरू लागल्या आहेत.१४ नोव्हेंबर, मुलांचे लाडके चाचा, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुलांना निखळ आनंद मिळावा, यासाठी या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. ह्यनेमेचि येतो मग पावसाळाह्ण या उक्तीप्रमाणे बालदिन साजरा होतो.

या दिवशी कुठल्या तरी बालगृहात जाऊन तेथील बालकांना खाऊ, कपडे, जेवण यांचे वाटप होते. काहीजण तर आपला वाढदिवसही या मुलांसमवेत साजरा करायला बालगृहात जातात. पण वर्षभर या मुलांचे पालनपोषण करणाऱ्या संस्थांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याची कल्पना फारच थोड्यांना असेल.आज ज्या संस्था पदरमोड करून बालगृह चालवत आहेत, त्यांना शासनाच्या जाचक धोरणामुळे संस्था चालवताना नाकीनऊ येऊ लागले आहे.. शासनाने कितीही घोषणा केल्या तरी राज्याच्या बाल विकास विभागाकडे खुद्द शासनाचेच दुर्लक्ष झाले आहे. आज महागाई गगनाला भिडू पाहात असताना शासनाकडून प्रतिपोषणाचा खर्च प्रतिमूल १५०० रूपये केवळ जाहीर करण्यात आले असला तरी प्रत्यक्षात अजूनही नऊशे रूपये इतकाच खर्च शासनाकडून दिला जात आहे. शासनाची इतर धोरणेही जाचक असल्याने या संस्था त्रस्त झाल्या आहेत.जिल्ह्यात रत्नागिरीतील डॉ. न. दा. पानवलकर बालगृह, माहेर, ओणी (ता. राजापूर) येथील वात्सल्य मंदिर, देवरूख येथील गोकुळ, लांजातील बालगृह या संस्था शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता निराधार मुलांचे भविष्य घडविण्याचे कार्य दात्यांच्या सहकार्याने, प्रसंगी पदरमोड करून करीत आहेत.

या संस्थांच्या मायेची ऊब या मुलांना मिळत असल्याने त्यांना विविध सणांचा आनंद मिळतो आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेतच नव्हे; तर विविध क्षेत्रातही यश मिळवू लागली आहेत. संस्थांच्या छताखाली राहून शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय करून स्वावलंबी बनली आहेत.शासनाच्या बालविकासाच्या केवळ घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात बालविकास झाकोळलेलाच आहे. बाल हक्कांची पायमल्ली होत आहे. मात्र, शासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. 

आज बालगृह चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या जाचक धोरणामुळे बालगृहे चालविणे जिकिरीचे झाले आहे. मुले ही देशाची बहुमोल संपत्ती आहे, असा विचार करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत. वंचित बालकांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात, त्यांची सोडवणूक व्हायला हवी. एक बालदिन साजरा करून बालकांचा विकास होणार नाही.- डॉ. महेंद्र गुजर,वात्सल्यमंदिर, ओणी

टॅग्स :children's dayबालदिनRatnagiriरत्नागिरी