शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी विरोध : कोकणातील आमदार एकवटले, नागपुरात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 17:41 IST

राजापूर तालुक्यातील नाणार व परिसरातील १७ गावांच्या हद्दीत येऊ घातलेल्या विनाशकारी ग्रीन रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विरोध दर्शवून हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी कोकण रिफायनरी विरोधी संघटनेने नागपूर येथे आजपासून आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह सर्वच आमदारांनी भेट घेऊन चर्चा केली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांसह आमदारांनी घेतली रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची भेटआंदोलनकर्त्या ग्रामस्थांची पालकमंत्री वायकर यांच्यासह सर्वच आमदारांनी केली चर्चा

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार व परिसरातील १७ गावांच्या हद्दीत येऊ घातलेल्या विनाशकारी ग्रीन रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विरोध दर्शवून हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी कोकण रिफायनरी विरोधी संघटनेने नागपूर येथे आजपासून आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह सर्वच आमदारांनी भेट घेऊन चर्चा केली.राजापूर येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला तेथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. रिफायनरी विरोधातील संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली माध्यमातून नागपूरच्या यशवंत स्टेडीयम या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, सदानंद चव्हाण, उदय सामंत, वैभव नाईक यांच्यासह अजित यशवंतराव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, हा प्रकल्प आणि याच तालुक्यात होत असलेला अणुउर्जा प्रकल्प या दोन प्रकल्पांमध्ये असलेले अंतर हे नियमानुसार पुरेसे नसल्याने भविष्यात दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भाग उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. रिफायनरी प्रकल्प शिवसेनेने आणला असला तरी राजकारण बाजूला ठेऊन आता हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करेन. विधानसभेतदेखील आवाज उठवेन, तसेच या प्रकल्पाविरोधात कुठेही यायची आपली तयारी आहे, असा शब्द त्यांनी दिला.त्याचबरोबर पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर शिवसेना ग्रामस्थांच्या बाजूने राहिल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत शिवसेना प्रकल्पविरोधात भूमिका घेईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेना प्रकल्पविरोधात भूमिका घेईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७konkanकोकणMLAआमदार