‘लोकमत’तर्फे रेडक्रॉस रक्तपेढीत रक्तदान शिबिर
By Admin | Updated: July 3, 2014 00:36 IST2014-07-03T00:30:13+5:302014-07-03T00:36:29+5:30
लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीदिनानिमित्त

‘लोकमत’तर्फे रेडक्रॉस रक्तपेढीत रक्तदान शिबिर
रत्नागिरी : ‘लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज (बुधवारी) येथील ‘लोकमत’ परिवारातर्फे रेडक्रॉस संस्थेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शहरातील अनेक रक्तदात्यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
स्व. जवाहरलाल दर्डा यांचा २ जुलै हा जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी येथील लोकमतच्या कार्यालयात दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
त्यानिमित्त येथील रेडक्रॉसच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला राजकीय कार्यकर्त्यांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली. बहुतांश रक्तदात्यांनी पहिल्यांदाच रक्तदान केले. यावेळी ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर झिमण, महेश चव्हाण, गुरूप्रसाद चव्हाण, सिद्धेश धुळप, गिरीष बावधाने, प्रमोद नार्वेकर, समीर चांदोरकर तसेच क्रांती घवाळी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही रक्तदान केले. (प्रतिनिधी)