शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नव्या बदलांमुळे शिवसेनेतील ‘नॉटरिचेबल’ नेते झाले ‘ॲक्टिव्ह’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:49 IST

रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी शिंदे गटाला जवळ करताच जुने शिवसैनिक पुन्हा एकवटले

अरुण आडिवरेकररत्नागिरी : राज्यातील सत्तांतर बदलानंतर जिल्ह्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. शिवसेनेतील जुने-नवे गट प्रकर्षाने समाेर आले असून, गेले अनेक महिने पक्षात असूनही ‘नाॅटरिचेबल’ झालेले पदाधिकारीही आता ‘ॲक्टिव्ह’ झाले आहेत. माजी खासदार अनंत गीते, नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख (ग्रामीण) ॲड. सुजित कीर, तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत ही मंडळी सक्रिय झाली आहेत.लाेकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनंत गीते पक्षापासून दूर हाेते. काेणत्याही राजकीय व्यासपीठावर त्यांनी उपस्थिती लावली नव्हती. जिल्ह्याशी संपर्कही कमी करून त्यांनी केवळ सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली हाेती. मात्र, शिवसेनेत पडझड सुरू हाेताच अनंत गीते पुन्हा सक्रिय झाले आहेत. आमदार याेगेश कदम यांच्या मतदारसंघात त्यांनी सभा घेऊन पक्षातील पदाधिकाऱ्यांची माेट बांधण्यास सुरुवात केली आहे.रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी शिंदे गटाला जवळ करताच जुने शिवसैनिक पुन्हा एकवटले आहेत. सामंत समर्थक महेश म्हाप यांना उपजिल्हाप्रमुख पदावरून बाजूला करत जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रकाश रसाळ यांची नियुक्ती केली. मात्र, त्यांनी पद स्वीकारण्यास नकार दिल्याने या पदावर सुजित कीर यांची वर्णी लावण्यात आली. गेले अनेक महिने सुजित कीर पक्षात असूनही पक्षापासून दूर हाेते. पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभागही नव्हता. आता पदावर नियुक्त करून त्यांना सक्रिय करून घेण्यात आले आहे.तालुका युवा अधिकारी पदावरून तुषार साळवी यांना हटवून वैभव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. त्यांनी हे पद न स्वीकारल्याने शहर संघटक प्रसाद सावंत यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. शहर संघटक म्हणून काम करताना त्यांनी शहरातील संघटनात्मक बांधणीकडे फारसे लक्ष दिलेले नाही. आंदाेलन, माेर्चे यातील सहभागाव्यतिरिक्त शहरात अन्य ठाेस कार्यक्रमही राबवण्यात आलेले नाहीत. मात्र, आता त्यांच्यावर जबाबदारी साेपवून पक्षाने पुन्हा ‘ॲक्टिव्ह’ केले आहे.नाराजीचा सूरप्रसाद सावंत यांनी पक्षाला साेडून  राष्ट्रवादीची वाट धरली  हाेती. त्यानंतर सामंत यांच्यासाेबत ते स्वगृही परतले. संघटक म्हणून ते आपली छाप पाडू न शकताही त्यांना पद दिल्याने नाराजीचा सूर आहे.

शिवसेनेतील संघटन थांबलेशहर संघटक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरात नव्याने काेणतेच प्रवेश झालेले नाहीत. संघटना वाढीसाठी कार्यक्रमही राबवण्यात आलेले नाहीत. अन्य पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचे कार्यक्रम हाेत असताना शिवसेनेतील संघटन मात्र थांबले हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे