शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
3
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
5
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
6
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
7
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
8
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
9
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
10
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
11
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
12
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
13
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
14
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
15
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
16
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
17
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
18
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
19
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
20
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणी, रत्नागिरी जिल्हा परिषदेत २६६ दिव्यांग कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:10 IST

कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

रत्नागिरी : दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्रे सापडल्याचे प्रकार काही जिल्ह्यांमध्ये घडले आहेत. ही बाेगस प्रमाणपत्रे देणाऱ्या दिव्यांगांंवर कारवाईही करण्यात आली आहे. याबाबत अधिवेनशनात विषय उपस्थित हाेताच राज्य शासनाने दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रत्नागिरीजिल्हा परिषदेकडून दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्यात येत आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांचे युनिक डिसॅबिलिटी आयडी क्रमांक तपासले जात आहेत.बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी लाटल्याप्रकरणी राज्यभरात कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. बनावट प्रमाणपत्राद्वारे काही जणांनी शासकीय नोकरी बळकावून पदोन्नती व इतर लाभ घेतल्याची प्रकरणे राज्यात उघड झाली आहेत. ही धक्कादायक माहिती उघड झाल्यानंतर राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२५ पासून राज्यातील सर्व शासकीय कार्यालये व विभागांमध्ये युडीआयडी कार्ड सादर करणे अनिवार्य केले आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्द उपस्थित करण्यात आला हाेता.चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या १२ कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी कारवाईही करण्यात आली आहे, तर युडीआयडी प्रमाणपत्र सादर न केल्याबद्दल चार कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांमध्ये एकूण २६६ कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत लाभ घेतला आहे. या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीलाजिल्हा परिषदेच्या अंतर्गत बदली प्रक्रिया राबवितानाही काही कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत बदल्या करून घेतलेल्या आहेत. तसेच काहींनी दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेत पदोन्नतीही मिळवली आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार असल्याने अशा कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Zilla Parishad Verifies Disability Certificates of 266 Employees

Web Summary : Ratnagiri Zilla Parishad is verifying disability certificates of 266 employees following reports of fake certificates. The verification includes checking Unique Disability ID numbers. Employees who obtained jobs or promotions using potentially fraudulent certificates are under scrutiny, causing anxiety.