कुणबी सेवा संघाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी रवी बावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST2021-09-05T04:34:56+5:302021-09-05T04:34:56+5:30

राजापूर : अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाची राजापूर तालुक्याची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, अध्यक्षपदी रवी बावकर आणि सचिवपदी ...

Ravi Bawkar as Rajapur taluka president of Kunbi Seva Sangh | कुणबी सेवा संघाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी रवी बावकर

कुणबी सेवा संघाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी रवी बावकर

राजापूर : अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाची राजापूर तालुक्याची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, अध्यक्षपदी रवी बावकर आणि सचिवपदी विलास पळसमकर यांची निवड करण्यात आली आहे. संघाचे अध्यक्ष पांडुरंग उपळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ही कार्यकारिणी निवडण्यात आली.

यावेळी संघाचे सल्लागार रवींद्र मटकर, ॲड. सुभाष बाणे, युवा विभागप्रमुख बापू ओकटे, महिला विभाग अध्यक्ष कल्पना पाटणकर, शाखा अध्यक्ष संतोष जोगले, बळीराम कामतेकर उपस्थित होते. आगामी तीन वर्षांसाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्ष - रवी बावकर, सचिव - विलास पळसमकर, कार्याध्यक्ष - संतोष चौगुले, खजिनदार - संकेत ठीक, उपाध्यक्ष - रमाकांत जावळे, डॉ. मंगेश खाडे, सहसचिव - चित्रा परशुराम, आदित्य बाणे, सहखजिनदार - सुभाष बांबरकर, अंतर्गत हिशेब तपासणीस - बाळा कुंभार यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Ravi Bawkar as Rajapur taluka president of Kunbi Seva Sangh