रत्नागिरीच्या चौकट क्रिएशनची ‘सीमारेषा’ प्रथम
By Admin | Updated: January 15, 2015 23:32 IST2015-01-15T21:51:36+5:302015-01-15T23:32:08+5:30
यरनाळकर एकांकिका स्पर्धा : कलावलय संस्थेच्यावतीने आयोजन

रत्नागिरीच्या चौकट क्रिएशनची ‘सीमारेषा’ प्रथम
वेंगुर्ले : येथील कलावलय संस्थेने आयोजित के लेल्या स्व. प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धेत रत्नागिरीच्या चौकट क्रिएशनची ‘सीमारेषा’ एकांकिका प्रथम आली. सिद्धीविनायक हॉलमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, पुणे, सातारा, डोंबिवली येथील १४ संघांनी सहभाग घेतला होता. समर्थ अकॅडमी, पुणेच्या ‘ओळखलंत का सर’ ही एकांकिका द्वितीय, तर संवाद साताऱ्याची ‘वेडिंग अॅनिव्हर्सरी’ तृतीय आली. मैत्री कलामंच, डोंबिवलीची ‘मुखवटे’ व छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची ‘आकडा’ यांना उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरविले. ‘वैयक्तिक’मध्ये उत्कृष्ट दिग्दर्शन- प्रथम-नंदकिशोर धुपेकर (सीमारेषा, रत्नागिरी), द्वितीय-सुमित वाडकर (ओळखलंत का सर, पुणे), तृतीय क्रमांक-संतोष पाटील (वेडींग अॅनव्हर्सरी, सातारा). तांत्रिक विभाग- प्रथम क्रमांक-सीमारेषा, (रत्नागिरी), द्वितीय-‘वेडींग अॅनिव्हर्सरी (सातारा), तृतीय क्रमांक -आकडा (सातारा). स्त्री अभिनय - अपूर्वा रिसबुड (ओळखलंत का सर, पुणे), मेघा जोशी (मुखवटे, डोंबिवली), हर्षला तोरसकर (फुटबॉल, कसाल). पुरुष अभिनय- सुमित वाडकर (ओळखलंत का सर, पुणे), विवेक गोखले (सीमारेषा, रत्नागिरी), संतोष पाटील (वेडींग अॅनिव्हर्सरी, सातारा). उदयोन्मुख दिग्दर्शकाचे बक्षीस श्री समर्थ कलाविष्कार, देवगडच्या ‘एंड आॅफ द बिगिनिंग’चे दिग्दर्शक अभिषेक कोयंडे यांना देण्यात आले.
परीक्षण जितेंद्र देशपांडे व प्रा. प्रकाश इनामदार यांनी केले. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी ‘कलावलय’चे अध्यक्ष रमेश नार्वेकर, माजी अध्यक्ष सुरेंद्र खामकर, अमोल महाजन, संजय पुनाळेकर, दिगंबर नाईक, राजन गिरप, शशांक मराठे, जितेंद्र वजराठकर, पंकज शिरसाट, पी. के. कुबल, प्रकाश पावसकर, जितेंद्र सामंत, अमेय तेंडोलकर, प्रवीण सातार्डेकर, विनायक जोशी, आदी उपस्थित होते. परीक्षकांच्या निर्णयाशी जुळणाऱ्या निर्णयाला सुजाण प्रेक्षकांसाठी ठेवलेले दोन हजारांचे बक्षीस निशा वायंगणकर हिने पटकाविले. (प्रतिनिधी)