रत्नागिरीची मैत्रेयी गोगटे महिला एकेरीत अजिंक्य

By Admin | Updated: February 29, 2016 00:18 IST2016-02-29T00:18:43+5:302016-02-29T00:18:43+5:30

राज्य गुणांकन कॅरम स्पर्धा : पुरूष गटात संदीप देवरूखकर विजयी; राज्यातील ५०० खेळाडूंचा समावेश

Ratnagiri's Maitreyi Gogte Women's Singles Ajinkya | रत्नागिरीची मैत्रेयी गोगटे महिला एकेरीत अजिंक्य

रत्नागिरीची मैत्रेयी गोगटे महिला एकेरीत अजिंक्य

रत्नागिरी : शिवाजी पार्क जीमखान्याने आयोजित केलेल्या आठव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन रोख पारितोषिकाच्या कॅरम स्पर्धेच्या पुरूष एकेरी, महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे ओएनजीसीमध्ये कार्यरत असलेला तिसरा मानांकित राष्ट्रीय विजेता संदीप देवरूखकर, रत्नागिरीच्या अग्रमानांकित मैत्रेयी गोगटे यांनी विजेतेपद पटकावले.
स्पर्धेत ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अंतिम फेरीत संदीप देवरूखकरने रंगतदार दोन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत जैन इरिगेशनचा माजी राष्ट्रीय विजेता योगेश डोंगडेचा २५-११, २५-१४ असा पराभव करून पहिल्या विजेतेपदाचा मान मिळवला. योगेश डोंगडेला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.
पहिल्या सेटमध्ये संदीप देवरूखकरने १९-११ अशी आघाडी घेत आठव्या बोर्डमध्ये ६ गुण मिळवून २५-११ असा सामना जिंकला. दुसऱ्या गेमध्ये पाचव्या बोर्डपर्यंत ७-७ अशी बरोबरी असताना सहाव्या बोर्डमध्ये ११ गुण घेऊन संदीप देवरूखकरने १८-७ ची आघाडी घेतली. नंतरच्या सातव्या बोर्डमध्ये योगेश डोंगडेचा ७ गुण घेऊन १४-१८ पिछाडीवर होता. निर्णायक आठव्या बोर्डमध्ये ७ गुण घेऊन दुसऱ्या गेममध्ये २५-१४ असा जिंकून संदीप देवरूखकरने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मोहम्मद गुफरानने ठाण्याच्या राजेश गोहीलचा रोमहर्षक तीन गेममध्ये रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत २५-0, १३-२५, २५-२० अशी मात करताना पहिल्या गेममध्ये ब्रेक टू फिनिशची नोंद केली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संदीप देवरूखकरने मोहम्मद गुफरानचा दोन गेममध्ये रंगलेल्या सामन्यात २५-१०, २५-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात योगेश डोंगडेने ठाण्याच्या राजेश गोहीलचा २५-८, २५-११ असा दोन गेममध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली.
महिला एकेरीमध्ये रत्नागिरीच्यामैत्रेयी गोगटेने तिसऱ्या मानांकित प्रीती खेडेकरचा रोमहर्षक दोन गेममध्ये २५-२०, २५-१९ असे नमवून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले व रोख ७ हजार ५०० रुपये व चषक याची मानकरी ठरली. उपविजेत्या प्रीती खेडेकरला ५ हजार व चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच केतन चिखले-रत्नागिरी, सुहास कारभारी-रायगड यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Ratnagiri's Maitreyi Gogte Women's Singles Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.