शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Navratri2022: भर पावसातही रत्नागिरीकरांनी पूर्ण केली 'दुर्गामाता दौड' video

By अरुण आडिवरेकर | Updated: September 29, 2022 16:47 IST

सलग दहाव्या वर्षी रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहर व आसपासच्या गावातील धारकऱ्यांची श्री दुर्गामाता दौड आयाोजित केली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे घटस्थापनेपासून दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (२९ सप्टेंबर) पहाटे पावसाने हजेरी लावली होती. मात्र, पावसाची तमा न बाळगता, पावसाच्या थारा अंगावर झेलत दुर्गामाता दौडमध्ये रत्नागिरीकरांनी सहभागी होत ही दौड पूर्ण केली.सलग दहाव्या वर्षी रत्नागिरीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शहर व आसपासच्या गावातील धारकऱ्यांची श्री दुर्गामाता दौड आयाोजित केली आहे. सोमवारी घटस्थापनेपासून ही दौड सुरू झाली. ही दौड विजयादशमीपर्यंत शहर आणि परिसरात होणार आहे. हातात भगवा झेंडा, पारंपरिक पोशाख आणि डोक्यावर फेटे बांधून स्त्री-पुरुषांनी मोठ्या संख्येने यात भाग घेतला होता.या दौडला मारुती मंदिर येथून सकाळी ५.४५ वाजता सुरुवात झाली. सकाळी पावसाने हजेरी लावल्याने ही दौड पूर्ण होणार की, नाही अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र, पावसाची कोणतीही तमा न बाळगता, दौड पूर्ण करण्याच्या इच्छाशक्तीने सारे एकत्र आले आहे आणि भर पावसातही दौड यशस्वी करण्यात आली. मारुती मंदिर, पॉवर हाऊस, विश्वनगर, पॉलिटेक्निकल रोड, मारूती मंदिर अशी दौड काढण्यात आली. यावेळी विश्वनगर मित्रमंडळातर्फे विराजमान करण्यात आलेल्या देवीचे धारकऱ्यांनी दर्शन घेतले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNavratriनवरात्री