शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

रत्नागिरी  जिल्हा परिषद :  प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्धर आजारांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:37 IST

मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, लकवा यांसारख्या दुर्धर आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे आता ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारांचे निदान करण्याची व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आता गावातच या आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी  जिल्हा परिषद :  प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्धर आजारांवर उपचार ग्रामीण जनतेला दिलासा, वेळ आणि पैसा वाचणार

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, लकवा यांसारख्या दुर्धर आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे आता ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारांचे निदान करण्याची व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आता गावातच या आजारांवर उपचार करणे शक्य होणार आहे.बदलती जीवनशैली आणि वाढते प्रदूषण यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. खाण्यावर योग्य नियंत्रण नसणे आणि खाण्याचे योग्य नियोजन नसणे, यामुळे अनेक आजार उद्भवू लागले आहेत. मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन), लकवा (स्ट्रोक) यांसारख्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

या आजारांमुळे अनेकवेळा रूग्णाचा मृत्यूही ओढवतो. त्यामुळे या आजारांचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. वेळीच त्यांचे निदान झाल्यास त्यावर उपचार करून आजार नियंत्रणात आणता येऊ शकतात.या आजाराची लक्षणे दिसल्यानंतर त्याचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे, हे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नसते. त्यामुळे अनेकवेळा निदान होऊनही कमी प्रमाणात उपचार केले जातात. मात्र, आता सर्वसामान्यांना त्यांच्या खिशाला परवडेल आणि जवळच्या ठिकाणी त्यावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.रत्नागिरीजिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर या आजारांचे निदान करता येणार आहे. तसेच त्या आजारांवरील औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र, आजाराचे प्रमाण अधिक आढळून आल्यास रूग्णाला जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथमच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये ३० वर्षांवरील कोणतीही व्यक्ती फायदा घेऊ शकते. या सुविधेसाठी अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले असून, लवकरच या आजारांचे निदान प्राथमिक आरोग्य केंद्रावर करण्यात येणार आहे.- डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.

उच्च रक्तदाबआहारात जास्त मीठ, अतिरिक्त शरीराचे वजन, धूम्रपान आणि दारू यामुळे उच्च रक्तदाब संभवतो. यामुळे क्रोनिक किडनी रोग, मूत्रपिंड, धमन्यांची संकुचिता होऊ शकते. सर्वसामान्य रक्तदाबाचे प्रमाण १०० ते १३० मिलिमीटर इतके असणे गरजेचे आहे.कर्करोगलठ्ठपणा, खराब आहार, दारूचे अति व्यसन, पर्यावरणी प्रदूषण यामुळे कॅन्सरचा आजार उद्भवतो. दीर्घकाळ खोकला लागणे, अनपेक्षितपणे वजन कमी होत जाणे. ही या आजाराची लक्षणे आहेत. त्याचबरोबर आतड्यांवरील हालचालींमध्ये बदल होतात.मधुमेहमधुमेह हा चयापचयाचा एक आजार आहे. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यास हा आजार उद्भवतो. वारंवार लघवी होणे, तहान लागणे आणि वाढलेली उपासमार ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. हा आजार दीर्घकालीन राहिल्यास हृदयविकाराचा आजार, लकवा, क्रोनिक कीडनी रोग, पाय अल्सर आणि डोळ्यांना त्रास होऊ शकतो.लकवा (स्ट्रोक)हा आजार मेंदूशी निगडीत आहे. अति रक्तस्त्राव आणि रक्तस्त्राव न होणे यामुळे मेंदूचे काम करणे बंद होते. त्यामुळे माणसाला लकवा येऊ शकतो. तंबाखू सेवन, धूम्रपान, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण यामुळे लकवा येण्याची शक्यता असते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्यRatnagiriरत्नागिरी