शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला पुन्हा स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 13:59 IST

रत्नागिरी : गेले अनेक महिने रखडलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला लोकसभा निवडणुकीतच मुहूर्त मिळाला होता. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक ...

रत्नागिरी : गेले अनेक महिने रखडलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला लोकसभा निवडणुकीतच मुहूर्त मिळाला होता. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांची लेखी परीक्षा १० जूननंतर घेण्यात येणार होती. तसे वेळापत्रक जाहीरही झाले हाेते. मात्र, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता ही परीक्षा स्थगित करण्यात आली.वर्ग ३ व ४ च्या भरती प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली. यामध्ये विविध संवर्गाच्या ७०० जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरती प्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी यातील काही संवर्गातील भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते. त्यांनतर न्यायालयाने हा विषय निकाली काढून ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती.जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या १८ पदांच्या ७१५ जागांसाठी ७०,६०८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात ग्रामसेवक पदासाठी ४१ हजार अर्ज दाखल झाले होते. ३ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली होती. या भरतीत आरोग्य सेवकच्या दोन पदांसाठी ६४ अर्ज, आरोग्य परिचारिकेसाठी २२७ जागांसाठी ९३२ अर्ज, आरोग्य सेवक २२ जागांसाठी ४,८१५ अर्ज, आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी ५२ जागांसाठी १,०५० अर्ज, औषध निर्माण अधिकारीच्या ३७ जागांसाठी ४,१९९ अर्ज, विस्तार अधिकारी सांख्यिकी ३ जागांसाठी ५६४, विस्तार अधिकारी कृषी ४ जागांसाठी ८११, वरिष्ठ सहायक लिपिक एका जागेसाठी २९९ अर्ज, पशुधन पर्यवेक्षक ४२ जागांसाठी १,२८६ अर्ज, कनिष्ठ आरेखक २ जागांसाठी ६१ अर्ज, वरिष्ठ सहायक लिपिक ६८ जागांसाठी ११,०४१ अर्ज, पर्यवेक्षिका ९ जागांसाठी १,५४८ अर्ज, कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा ३१ जागांसाठी १,५५७ अर्ज, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक २२ जागांसाठी ७४४ अर्ज, लघुलेखक उच्च श्रेणी १ जागेसाठी ११७ अर्ज दाखल झाले होते.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २६ जूनला मतदान होणार असून, १ जुलैला मतमोजणी होणार आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद