शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा बँकेची लवेल केंद्रावरील परीक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 12:34 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाइन नोकरभरती प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रांवर दि. १ ते ४ ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाइन नोकरभरती प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रांवर दि. १ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तीन सत्रांमध्ये घेतली जात आहे. परंतु, या चार परीक्षा केंद्रांपैकी फक्त घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मु. पो. लवेल, ता. खेड) या परीक्षा केंद्रावर नेटवर्कसंदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे १ ते ४ सप्टेंबर रोजी होणारी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यात आली आहे.या परीक्षा केंद्रावर नेटवर्कसंदर्भात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे १ आणि २ सप्टेंबर रोजी होणारी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यात आली होती. याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु, अद्याप या केंद्रावरील नेटवर्कची तांत्रिक अडचण शर्थीचे प्रयत्न करूनही दुसऱ्या दिवशीही दूर न झाल्याने १ ते ४ सप्टेंबर या चारही दिवसांमध्ये होणारी ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्याबाबत या केंद्रावर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या एजन्सीकडून ई-मेलद्वारे, मेसेजद्वारे कळविणेत आले आहे. तसेच पोर्टलवरही प्रसिध्द करण्यात आले आहे.ही रद्द झालेली परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, त्यासंबंधीची माहिती संबंधित उमेदवारांना परीक्षेच्या तारखेपूर्वी तीन ते चार दिवस आगाऊ मेसेज द्वारे, ई-मेलद्वारे तसेच वेबसाइटवर परीक्षा घेणाऱ्या संबंधित एजन्सीकडून कळविण्यात येणार आहे. उर्वरित इतर तीन केंद्रांवरील परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीbankबँक