शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत तलवारधारी तरूणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:31 IST

रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार ते प्रमोद महाजन मैदानादरम्यान हातात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या पुण्याच्या तरूणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने रात्री ताब्यात घेतले. राहुल दिगंबर गायकवाड (२४) असे त्याचे नाव आहे. मात्र तो तलवार घेऊन नेमका कशासाठी रत्नागिरीत आला होता? तो कोणाचा शोध घेत होता, हे अजून उलगडलेले नाही.

ठळक मुद्देरत्नागिरीत तलवारधारी तरूणाला अटकशहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेची कारवाई

रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार ते प्रमोद महाजन मैदानादरम्यान हातात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या पुण्याच्या तरूणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने रात्री ताब्यात घेतले. राहुल दिगंबर गायकवाड (२४) असे त्याचे नाव आहे. मात्र तो तलवार घेऊन नेमका कशासाठी रत्नागिरीत आला होता? तो कोणाचा शोध घेत होता, हे अजून उलगडलेले नाही.एक तरुण हाताता तलवार घेऊन शहरातील आठवडा बाजार ते प्रमोद महाजन मैदानादरम्यान फिरत असल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेचे कर्मचारी महेश पाटील, गणेश सावंत यांना त्यांच्या खास खबऱ्याकडून मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यासह तत्काळ घटनास्थळी जात त्याला तलवारीसह ताब्यात घेतले.

त्यांनी त्याला विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तो कोणाचातरी घातपात करण्यासाठी तलवार घेऊन फिरत असल्याचा संशय बळावला आहे.राहुल हा मुळचा पुणे येथील आहे. तो तलवार घेऊन का फिरत होता, हे अध्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरानजीक उबेद होडेकर यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले होते. यातील संशयित आरोपींचे अटकसत्र सुरु असतानाच राहुल शहरात तलवार घेऊन फिरत असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. राहुल त्याच प्रकरणाशी संबंधित आहे का, याचाही तपास केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी