शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : जग जाते आहे विनाशकारी विज्ञानाच्या विळख्यात : निरंजन वर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 18:58 IST

पंचमगव्य डॉक्टर्स असोसिएशन (पंडा) यांच्या विद्यमाने हमारी सोच गोमातासे निरोगी भारत विषयानुशंगाने महाराष्ट्र राज्य पंचम पंचगव्य संमेलन स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर, पावस (रत्नागिरी) यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पंचगव्य विद्यापीठ, कांजीपूरमचे कुलपती गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा बोलत होते.

ठळक मुद्दे- पंचमगव्य डॉक्टर्स असोसिएशन यांच्या विद्यमाने पावस येथे आयोजन - महाराष्ट्रामधून १५० गव्यसिद्ध, गोमाताप्रेमी सहभागी देशात गव्यसिद्धांच्या १०० गोशाळा

पावस : विज्ञानाच्या अनिर्बंध वापरामुळे सृष्टीचे संतुलन बिघडले आहे. जग या विनाशकारी विज्ञानाच्या विळख्यात सापडले आहे. अमेरिकेचे आकाश प्रदूषित झाल्याने तेथील एक चतुर्थांश जनसंख्या कारागृहात असते. नासाने भविष्यातील संकट ओळखून एका अस्थापनाला गोमयाधारीत हायड्रोजनसारख्या वायूंवर चालणाऱ्या संशोधनाचे कंत्राट दिले आहे. गोमय, मूत्र, दूध यामध्ये अत्यंत उपयोगी घटक आहेत. जगाला या विनाशातून केवळ गोमाताच वाचवू शकते, असे उद्गार पंचगव्य विद्यापीठ, कांजीपूरमचे कुलपती गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा यांनी येथे काढले.पंचमगव्य डॉक्टर्स असोसिएशन (पंडा) यांच्या विद्यमाने हमारी सोच गोमातासे निरोगी भारत विषयानुशंगाने महाराष्ट्र राज्य पंचम पंचगव्य संमेलन स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर, पावस (रत्नागिरी) यांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.

या संमेलनासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे १५० गव्यसिद्ध तसेच काही स्थानिक गोमाताप्रेमी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने तसेच राजीव दीक्षित यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक येथील आमोद केळकर यांनी केले.गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा पुढे म्हणाले की, आज देशात गव्यसिद्धांच्या सुमारे १०० गोशाळा आहेत. प्रत्येक गोशाळेची गोसंवर्धनाची मर्यादा आहे. त्या अतिरिक्त असणारी वासरे, गाई आपण गरजू गव्यसिद्धांना दान देऊन त्यांना उभे केले पाहिजे. गुरुकुलम इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय भाषेत शिक्षण देते. शासनाच्या काही अटीमुळे मात्र आपणाला गुरुकुलममध्ये प्रवेश १०+२ असा ठेवावा लागला आहे.यावेळी राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माने म्हणाले की, गाय-बैल जरी वृद्ध झाले तरी टाकाऊ नाहीत. ते शेवटपर्यंत आपल्याला सेवा देतात, असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी विजय जोशी म्हणाले की, समाजात गोमातेविषयी जागृती होत आहे. परंतु त्याला दिशा देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ते सिंधुदुर्गात शिबिराचे आयोजन करत असल्याचे सांगितले.गोमाता वाचली पाहिजेभारताची ताकद गाय आहे, ती नष्ट करण्याचे षडयंत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर राबवले गेले. यासाठी गोमासाला वाढीव मागणी मूल्य देणे संकरीकरणातून भारतीय गोवंश नष्ट केले. यासाठी गायींचे रक्षण आपणच केले पाहिजे. यासाठी भारतीय संविधानात असणाऱ्या कायद्यांच्या कार्यवाहीसाठी आपण शासनाला भाग पाडले पाहिजे, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHealthआरोग्य