शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : वेळ बघूनच श्वान चावणार का? : श्वान चावलेल्या रूग्णासाठीही वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 17:28 IST

श्वान कोणाला कधी आणि कसा चावेल हे सांगणे कठीण आहे. पण, श्वान चावल्यास इंजेक्शन देण्याची वेळ मात्र डॉक्टरांनी निश्चित केली आहे. श्वान चावल्यास दुपारी १२ ते ५ या वेळेतच इंजेक्शन देण्यात येईल, अशी सूचनाच दापोली तालुक्यातील आसूद आरोग्य केंद्रात लावण्यात आली आहे.

ठळक मुद्दे वेळ बघूनच श्वान चावणार का? : श्वान चावलेल्या रूग्णासाठीही वेळ!आसूद आरोग्य केंद्रातील अजब कारभाराबाबत नाराजी

दापोली : श्वान कोणाला कधी आणि कसा चावेल हे सांगणे कठीण आहे. पण, श्वान चावल्यास इंजेक्शन देण्याची वेळ मात्र डॉक्टरांनी निश्चित केली आहे. श्वान चावल्यास दुपारी १२ ते ५ या वेळेतच इंजेक्शन देण्यात येईल, अशी सूचनाच दापोली तालुक्यातील आसूद आरोग्य केंद्रात लावण्यात आली आहे.दापोली तालुक्यात श्वान चावण्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. श्वान चावल्यामुळे ग्रामीण भागात अनेकजण जखमी झाले आहेत. या रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ उपचार मिळण्यास मदत होत आहे.श्वानदंशावर तत्काळ उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्रांमध्ये योग्य तो औषधसाठाही ठेवण्यात आला आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. असे असले तरी तालुक्यातील आसूद आरोग्य केंद्रात मात्र श्वान चावल्यास देण्यात येणाऱ्या इंजेक्शनसाठी वेळच ठरवून दिली आहे. या वेळेनुसार सकाळी किंवा सायंकाळी एखाद्याला श्वानाने दंश केल्यास त्याला इंजेक्शन मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेतच श्वानदंशाची लस किंवा इंजेक्शन दिले जाणार असल्याची सूचना भिंतीवर चिकटवण्यात आली आहे. त्यामुळे आसूद आरोग्य उपकेंद्रअंतर्गत कोणालाही श्वानाने चावा घेतल्यास आधी वेळ बघा नंतरच लस घ्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

त्यातच वेळ बघूनच श्वानाला सांगावे लागेल, असेही ग्रामस्थांतून बोलले जात आहे. आसूद आरोग्य केंद्राच्या इमारतीबाहेर लावण्यात आलेल्या सूचनेवर आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची सही आणि शिक्काही आहे. त्यामुळे ही सूचना अधिकृत असल्याचेही दिसत आहे. अशा प्रकारच्या अनोख्या सूचनेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdogकुत्राhospitalहॉस्पिटल