शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रत्नागिरी : नवऱ्याच्या खुनी हल्ल्यात पत्नी गंभीर, गुन्हा दाखल करून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 14:07 IST

किरकोळ कारणावरून दिवाळीच्या पूर्वसंध्येला विवाहितेवर नवऱ्याने जबर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात विवाहितेच्या डोक्याला ४० टाके पडले असून सध्या ती मुंबई येथे जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये गंभीर जखमी झालेली विवाहिता ही दापोली येथील आहे.

ठळक मुद्देनवऱ्याच्या खुनी हल्ल्यात पत्नी गंभीर मुंबई येथे जे. जे. रुग्णालयात उपचार

दापोली : किरकोळ कारणावरून दिवाळीच्या पूर्वसंध्येला विवाहितेवर नवऱ्याने जबर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात विवाहितेच्या डोक्याला ४० टाके पडले असून सध्या ती मुंबई येथे जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये गंभीर जखमी झालेली विवाहिता ही दापोली येथील आहे.दापोली येथील भारतीय स्टेट बँकेतील कर्मचारी रवींद्र खोपकर यांची मुलगी अवनी अल्पेश भोसले (२७) हिचा विवाह अल्पेश भोसले (तळोजा एमआयडीसी, नवी मुंबई) या युवकाबरोबर झाला होता. मात्र काही दिवसावर तिच्या लहान मुलीचा वाढदिवस होता. हा वाढदिवस आपल्या आई वडिलांच्या गावी करण्याचा अल्पेश याचा विचार होता. मात्र पत्नी अवनी हिने या गोष्टीला विरोध केला होता.

बाळंतपणाच्या वेळी तुमचे आई बाबा मला व मुलीला पहायलासुध्दा फिरकले नाहीत. त्यामुळे आपल्या मुलीचा वाढदिवस आपण आपल्या घरीच साजरा करू, असे तिचे म्हणणे होते. मात्र ही बाब नवऱ्याला रुचली नाही. त्याचा राग मनात धरून दि. ४ नोव्हेबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या विषयावरून पुन्हा वाद झाला व रागाच्या भरात नवरा अल्पेश याने अवनीवर खुनी हल्ला केला. चाकूच्या सहाय्याने त्याने पत्नीवर सपासप वार केले.एवढ्यावरच न थांबता क्रिकेटच्या बॅटने दोन्ही हातापायावर फटके मारले. पत्नीला बेदम मारहाण करुन बेशुद्ध अवस्थेत तिला एका खोलीमध्ये कोंडुन ठेवले व तो बाहेर फिरायला गेला. फिरून आल्यावर रक्ताच्या थोराळ्यात विव्हळत पडलेल्या अवनीला पुन्हा बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोटावर व मानेवर पाय ठेऊन घरातील सिलेंडरही तिच्या डोक्यात घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.घटना घडत असतानाच इमारतीमधील काही प्लॅटधारक दिवाळीचा कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी अल्पेश भोसले याच्या घरी आले असताना हा प्रकार समोर आला. रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेल्या आपल्या पत्नीला गाडीत टाकून तो पनवेल येथील हॉस्पीटलमध्ये घेऊन गेला पण जबर जखमी झालेल्या अवनीला अधिक उपचारासाठी मुंबई येथे जे जे रूग्णालयात हलविण्यात आले.घटनेची खबर पनवेल पोलिसांना मिळताच त्यांनी अवनीचे जाब जबाब नोंदवून घेतले व अल्पेश बापू भोसले याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३२५, ३२६ व ४९६ (अ ) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी