शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  अभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 17:59 IST

विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले.

ठळक मुद्देअभ्यासक्रम निवडताना विचार करावा : सुभाष देव‘लोकमत’तर्फे दहावी, बारावीतील गुणवंतांचा गौरव सोहळा

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना भविष्याचा विचार करावा. चलनात मागणी असणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करावी, असे प्रतिपादन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांनी केले.

गुणवत्तेची भरपाई गुणांनी होत नाही, त्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण अभिनंदनीय आहेत. लोकमत आयोजित कार्यक्रमात सर्व अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे मुलांबरोबर पालकांनाही विविध शाखांविषयीचे ज्ञान अवगत झाले.दहावी व बारावी हा सर्वांच्याच आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

हे मार्गदर्शन संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मिळाले तर ते अधिक उपयुक्त ठरते. हे लक्षात घेऊन ‘लोकमत’तर्फे ‘यशाची गुरुकिल्ली’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सुभाष देव यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.सध्याच्या विद्यार्थ्यांना निवडीसाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत. मात्र, विद्यार्थी, पालकांची मानसिकता महत्त्वाची आहे. इंजिनिअरिंग निवडतानासुध्दा ठराविक शाखांपेक्षा संलग्न शाखांचाही विचार करणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.निवडीबरोबर पर्यायांचाही वापर केला पाहिजे. बहुतांश पालक दहावी, बारावीनंतर सक्रीय होतात. मात्र, तसे न करता प्रवेश घेण्यापूर्वीच सक्रीय होणे महत्त्वाचे आहे. विविध संस्थांना भेटी देऊन तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थी काय शिकतो, याऐवजी कशासाठी व तो किती महत्त्वाचा आहे, याची माहिती घेणे गरजेचे आहे. दहावीतील गुण पुढच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर ते विसरले पाहिजेत, असाही सल्ला डॉ. देव यांनी विद्यार्थ्यांना दिला.उच्च शिक्षणातील विविध संधी, विविध क्षेत्रात स्पेशलायझेशन, योग्य महाविद्यालय व विद्यापीठ कसे निवडावे, प्रवेश प्रक्रिया याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यात दहावी व बारावी परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटRatnagiriरत्नागिरीcollegeमहाविद्यालय