शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : बेकायदेशीर वाळूची वाहतूक, खेडमध्ये सहा डंपरवर दंडाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:54 IST

बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारे ६ डंपर खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनाने आणि तहसीलदार अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे मंडल अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने पकडून ते महाडनाका येथील मैदानावर ठेवले होते.

ठळक मुद्देकुंभारवाड्याकडून महाडनाकामार्गे वाळूवाहतूकप्रांताधिकारी, तहसीलदारांनी लक्ष देण्याची गरज..तरच वाहतुकीला आळा बसेल

भोस्ते : बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारे ६ डंपर खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनाने आणि तहसीलदार अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे मंडल अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने पकडून ते महाडनाका येथील मैदानावर ठेवले होते. या कारवाईमुळे बेकायदशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रत्येकी ५० हजारांची दंडात्मक कारवाई संबंधित डंपर मालकांवर केल्याचे वृत्त आहे.यावेळी जप्त केलेल्या डंपरमध्ये (एमएच ०८ / डब्ल्यू ८१८५), (एमएच ०८ / डब्ल्यू ८४१७), (एमएच ०८ / डब्ल्यू ८२०५), (एमएच ०८ / डब्ल्यू ३५२५), (एमएच ०८ / डब्ल्यूएपी ०६५८), (एमएच ०८ / डब्ल्यू ८४१४) यांचा समावेश आहे. वाळूची वाहतूक करणाऱ्या या डंपरवर कारवाई करताना आवश्यक त्या रॉयल्टी तसेच अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीदरम्यान दोन डंपर चालकांकडे ही कागदपत्रं आढळून आली नाहीत. त्यामुळे या डंपर चालकांवर प्रत्येकी ५० हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली तर उर्वरित वाळूचे डंपर सोडण्यात आल्याची माहिती महसूल विभागातील सुत्रांकडून मिळाली.

या कारवाईबाबत प्रांताधिकारी सोनाने यांच्याशी संपर्क साधला असता, ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण मतदारसंघ निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याने विस्तृत माहिती मिळू शकली नाही.दरम्यान, खेड शहरात बेकादेशीर वाळूची वाहतूक ही कुंभारवाड्याकडून शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागून पालेकर यांच्या दवाखान्याजवळून महाडनाकामार्गे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे प्रांताधिकारी व तहसीलदारांनी लक्ष दिल्यास या चोरट्या पध्दतीने होणाऱ्या वाहतुकीला आळा बसेल, असे मत खेडमधील जागरुक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsandवाळू